बेळगाव : पुढारी वृत्तसेवा शहरांतर्गत आणि नजीकच्या काही गावांमध्ये धावणार्या बसच्या तिकीट दरात परिवहन महामंडळाने कपात केली आहे. मात्र, ग्रामीण भागाच्या बससेवेचे दर जैसे थे आहेत. त्यामुळे ग्रामीण प्रवाशांच्या बाबतीत परिवहनने पक्षपात केल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. शहरांतर्गत पहिल्या स्टेजसाठी एक रूपया तर दुसर्या स्टेजसाठी दोन रूपये तिकीट दरात कपात केली आहे. मात्र ग्रामीण भागात धावणार्या बसचे दर जैसे थे ठेवण्यात आले आहेत.
शुक्रवारपासून नवीन तिकीट दर लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. शिवाय बसवाहक आणि प्रवाशांची चिल्लर पैशांसाठी होणारी दैनंदिन कटकटही थांबली आहे. पहिल्या स्टेजसाठी 6 रुपये तिकीट दर होता. तो आता 5 रुपये करण्यात आला आहे. त्याचबरोबर दुसर्या स्टेजसाठी 12 रुपये तिकीट दर होता. तो आता 10 रुपये करण्यात आला आहे. ग्रामीण भाग व लांब पल्ल्याच्या बस तिकीट दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
शहरांतर्गत प्रवास करणार्या प्रवाशांना दोन स्टेजमध्ये तिकीट दरकपातीचा लाभ मिळणार आहे. पुढच्या स्टेजचा दर पूर्वीप्रमाणेच राहील. ग्रामीण भागात धावणार्या बसच्या तिकीट दरात कपात करण्यात आलेली नाही.
– के . के . लमाणी, आगारप्रमुख
नवीन बस तिकीट दर असे
प्रवास……………..नवा दर…. कपात
सीबीटी ते कोर्ट……………5 रु…….1 रु.
सीबीटी ते ध. संभाजी चौक …10 ……2
सीबीटी ते महांतेशनगर……..5 ……..1
सीबीटी ते वंंटमुरी………….10…….2
सीबीटी ते अशोकनगर…. ….5……..1
सीबीटी ते पिंपळकट्टा……….5……..1
सीबीटी ते गांधीनगर………..5……..1
सीबीटी ते महांतेश नगर……..5……..1
कोर्ट ते ध. संभाजी चौक…….5……..1
कोर्ट ते केएलई……………10…….2
ध. सं. चौक ते रेल्वे स्टेशन….5……..1
ध. सं. चौक ते शहापूर नाका…10……2
ध. सं. चौक ते हरिमंदीर……..10……2
रेल्वे स्टेशन ते वडगाव……….10…..1
रेल्वे स्टेशन ते अनगोळ……..10……1
रेल्वे स्टेशन ते हरिमंदिर…….. 5…….1
हरिमंदिर ते अनगोळ……….. 5…….1
शहापूर नाका ते वडगाव…. …. 5…….1
काकती ते होनगा…………….5…….1
काकती ते यमनापूर…………..5…….1
होनगा ते यमनापूर …………..10……1
बाळेकुंद्री खुर्द ते मोदगा……..10……2
मास्तमर्डी ते शगनमट्टी……….10……2
हलगा ते बस्तवाड ………….10……2