बेळगाव

बंगळूर : पतीच्या ठाण्यात पत्नीवर गुन्हा!

अनुराधा कोरवी

बंगळूर : पुढारी वृत्तसेवा: कोयता घेऊन स्टेट बँक कर्मचार्‍यांना धमकावणार्‍या साहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाच्या (एएसआय) पत्नीविरुद्ध त्याच्याच ठाण्यामध्ये गुन्हा नोंदविण्यात आला. बंगळुरातील देवनहळ्ळीत ही घटना घडली. सुनीता बी. सी. (वय 40) असे महिलेचे नाव आहे. तिचे पती रवींद्रने कर्जाचे हप्ते न भरल्याने नोटीस बजावण्यात आली होती.

त्यामुळे बँक अधिकार्‍यांनी त्यांचे घर सील केले होते. याचा जाब विचारण्यासाठी तिने हातात कोयता घेऊन थेट बँक गाठली. बँकेत प्रवेश करण्याआधी तिने बँकेबाहेरील एटीएम आणि कारच्या काचा फोडल्या. हातात कोयता घेऊन प्रवेश करणार्‍या महिलेला पाहिल्यानंतर बँक अधिकार्‍यांनी तत्काळ बँकेचा मुख्य दरवाजा बंद केला.

त्यानंतर देवनहळ्ळी पोलिसांना कल्पना दिली. काही मिनिटांतच महिला अधिकार्‍यांसह पोलिस दाखल झाले. त्यांच्यावरही संशयित महिलेने हल्ल्याचा प्रयत्न केला. पण, पोलिस उपनिरीक्षक सावित्री यांनी कोयत्याचा वार सहन करुन सुनीताला पकडले.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT