निपाणी : पुढारी वृत्तसेवा : साखरवाडी (निपाणी) येथील जवान राजेंद्र पांडुरंग कुंभार (वय ४५) यांचा उत्तर प्रदेश येथील तुंदला रेल्वे स्थानकावर अपघाती मृत्यू झाला. कुंभार यांच्यावर शनिवारी सायंकाळी बसवानगर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
ते पंधरा दिवसाच्या सुट्टीसाठी आपल्या निपाणीला येत होते. यावेळी राजेंद्र कुंभार अपघात झाला. त्यांच्यापश्चात पत्नी, दोन भाऊ असा परिवार आहे.