बेळगाव

निपाणी : निवडणूक लढवणार नाही, मार्गदर्शकाची भूमिका बजावणार

दिनेश चोरगे

निपाणी; पुढारी वृत्तसेवा : काँग्रेसने आपणास पाचवेळा उमेदवारी दिली होती. त्यापैकी तीन वेळा यश मिळाले तर दोन वेळा पराभव झाला असून पक्षाची मते काही कमी झालेली नाहीत. ती वाढतच गेली आहेत. आता सर्वसामान्य कार्यकर्त्याला तिकीट मिळावे, अशी माझी मनापासूनची इच्छा होती. आगामी निवडणुकीत उभे न राहण्याचा निर्णय घेतला आहे. आपण बाहेर राहून मार्गदर्शकाची भूमिका बजावणार असल्याचे माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

माजी नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर म्हणाले, गेली तीस वर्षे आम्ही काकासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहोत. गेली 25 वर्षे काकासाहेब पाटील यांनी पक्ष टिकून ठेवण्याचे काम केले आहे. सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला तिकीट मिळावे, अशी रघुनाथराव कदम यांची इच्छा होती त्यांनी त्यावेळी वीरकुमार पाटील यांना निवडून आणून दाखवले आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्याला नेतृत्वाची संधी दिली गेली पाहिजे. कुटुंबाचे राजकारण आता नको. माजी आमदारांच्या मुलांना नेतृत्व करण्याची संधी दिली जाऊ नये. 1999 पासून 2018 पर्यंत आम्ही पक्षासाठी काम केले आहे. आता इच्छुकांच्या यादीत माझ्याबरोबर बाळासाहेब देसाई सरकार यांच्याही नावाचा समावेश करावा. पक्ष ज्या उमेदवाराला संधी दिली त्याच्या विजयासाठी सर्वजण काम करू.

चिकोडी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे म्हणाले, 2023 मध्ये होणार्‍या विधानसभा निवडणुकीसाठी पक्षश्रेष्ठींनी निपाणी विधानसभा मतदारसंघातून इच्छुकांची नावे मागितली होती. त्यामुळे पक्षाकडून आतापर्यंत सहा नावे पाठवली गेली आहेत. त्यामध्ये आता विलास गाडीवड्डर व बाळासाहेब देसाई सरकार यानावांचा देखील समावेश करत असून त्या मागणीचे पत्र गोकाक येथे जाऊन केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश यांना देण्यात येणार आहे. पक्ष ज्या उमेदवाराला तिकीट देईल त्याच्या पाठीशी ठाम राहून सर्वजण काम करतील व पक्षाच्या विजयासाठी झटतील. यावेळी नगरसेवक डॉ. जसराज गिरे, शेरू बडेघर संजय पावले, दत्ता नाईक, शौकत मनेर, माजी नगराध्यक्ष विजय शेटके, दिलीप पठाडे यांची उपस्थिती होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT