बेळगाव

निपाणी : दुचाकींच्या धडकेत लाकूड व्यापारी ठार : दोघे जखमी

दिनेश चोरगे

निपाणी;पुढारी वृत्तसेवा :  दुचाकींच्या धडकेत लाकूड व्यापारी ठार तर दोघे जखमी झाले. रमेश विश्राम पटेल ( वय 51, रा. श्रीनगर, निपाणी) असे मृताचे नाव आहे. निपाणी-मुरगूड मार्गावर श्रीनगर वळणावर गुरूवारी हा अपघात घडला होता. पटेल यांच्यावर कोल्हापूर येथे उपचार सुरू होते. उपचारादरम्यान शुक्रवारी दुपारी त्यांचा मृत्यू झाला.

रमेश पटेल गुरुवारी रात्री वखार बंद करून दुचाकीवरून घराकडे जात होते. ते श्रीनगर वळणावर आले असता समोरून येणार्‍या दुचाकीची धडक त्यांना बसली. यामध्ये पटेल यांच्यासह दुचाकीवरील विनीत अमरमड्डी (रा. पट्टणकुडी) महेश रमेश सूर्यवंशी हे तिघेजण गंभीर जखमी झाले. रमेश यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक बनल्याने पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता शुक्रवारी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

SCROLL FOR NEXT