बेळगाव

ट्रकची कारला धडक, बेळगावच्या चौघांसह पाचजण जखमी

अनुराधा कोरवी

निपाणी : पुढारी वृत्तसेवा :  पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर मानवी बंगल्यासमोरील भुगारी मार्गावर भरधाव ट्रकची विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारला समोरून धडक बसल्याने झालेल्या अपघातात बेळगाव येथील कारमधील चौघे तर ट्रकचालक असे एकूण पाचजण जखमी झाले. हा अपघात रविवारी दुपारी एकच्या सुमारास झाला.road

आसिफ खान (वय २४) रा. गुडगाव, हरियाणा असे ट्रकचालकाचे नाव असून कारमधील कृष्णात शिंदे (वय ५६ रा. बेळगाव) यांच्यासह तिघे जखमी झाले आहेत. ट्रक भुयारी मार्गावर आला असता चालकाचा ताबा सुटल्यामुळे ट्रक दुभाजकावर आदळून कोल्हापूरहून बेळगावकडे जाणाऱ्या कारवर आदळून सर्व्हिस रोडवर जाऊन पलटी झाला.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच रस्ते देखभाल औताडे कंपनीच्या भरारी पथकाचे निरीक्षक विष्णू गडकरी यांनी शहर पोलिसांना पाचारण केले. जखमींना सरकारी महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

SCROLL FOR NEXT