बेळगाव

जगात भारताचे नाव उंचावले : अमित शहा

अमृता चौगुले

बंगळूर; पुढारी वृत्तसेवा : भाजपच्या सत्तेआधी वर्तमानपत्रात रोज भ्रष्टाचाराच्या बातम्या छापून येत होत्या. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कामगिरीची प्रशंसा संपूर्ण जगाकडून केली जात आहे. भाजपने जागतिक पातळीवर भारताची प्रतिमा उंचावल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले.

येथे आयोजित 'संकल्प से सिद्धी' कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, 2014 च्या आधी देशाचे जागतिक पातळीवरील चित्र वेगळे होते. आत्मनिर्भर भारत, मेक इन इंडिया अंतर्गत सर्व स्तरांवर विकास साधला जात आहे. पुढील पंचवीस वर्षांचा आराखडा तयार केला आहे.

2019 मध्ये कोरोनामुळे जग हादरले. त्यावेळी पंतप्रधान मोदींनी संशोधकांना भारतातच लस तयार करण्यास सांगितले. यामध्ये यश आले. जगाला ही लस उपलब्ध करण्यात आली. कोरोना नंतरच्या काळात आर्थिक प्रगती होत आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवावेळी देशाने केलेल्या प्रगतीची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवावी.

पक्षाविरुद्ध कार्यकर्त्यांच्या टीकेवर शहा नाराज

भाजपची सत्ता असणार्‍या कोणत्याही राज्यात पक्षाचे कार्यकर्ते किंवा हिंदुत्ववादी संघटना पक्षाविरुद्ध नाहीत. पण, कर्नाटकात सध्या निर्माण झालेली स्थिती योग्य नाही. त्यावर नियंत्रण ठेवून नाराजी दूर करावी. विधानसभा निवडणुकीची तयारी करण्याची ताकीद केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप श्रेष्ठी अमित शहा यांनी राज्यातील नेत्यांना दिली.

'संकल्प से सिद्धी' कार्यक्रमात भाग घेण्यासाठी ते बंगळुरात आले आहेत. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा, प्रदेशाध्यक्ष नलीनकुमार कटील यांची बैठक त्यांनी घेतली. अनेक राज्यांत भाजपची सत्ता आहे. पण, कोणत्याही राज्यात भाजप कार्यकर्ते पक्षाविरुद्ध टीका करत नाहीत. कर्नाटकात निर्माण झालेली स्थिती चिंताजनक आहे. ही नाराजी दूर केली नाही तर त्याचे दुष्परिणाम पक्ष संघटनेवर होतील, असा इशारा शहा यांनी दिला.

हिंदुत्ववादी संघटनांच्या नेत्यांच्या त्यांचा तपास गांभीर्याने करावा. याबाबत सरकारने कठोर निर्णय घ्यावा. इतर धर्मातील नेत्यांच्या हत्येचा तपासही गांभीर्याने करावा. कोणत्याही कारणास्तव कायदा आणि सुव्यवस्था बिघडू देऊ नये. लवकरच निवडणूक होणार असून या काळात कायदा आणि सुव्यवस्था महत्त्वाची आहे. पक्षाच्या विविध संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी राजीनामे दिले आहेत. ते मंजूर करू नयेत. हिंदुत्ववादी संघटनांच्या नेत्यांच्या हत्यांचा तपास गांभीर्याने करावा. याबाबत सरकारने कठोर निर्णय घ्यावा. इतर धर्मातील नेत्यांच्या हत्येचा तपास आणि गांभीर्याने करावा. भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. दोनवेळा पक्ष सत्तेवर आला आहे. यामागे कार्यकर्त्यांचे श्रम आहे. त्यांच्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची तंबी शहा यांनी दिल्याचे समजते.

येडियुराप्पा यांना आश्‍वासन

आपल्या मुलाला योग्य पद देण्याविषयी काळजी करू नये. पक्ष संघटनेला सहकार्य करावे. राज्याचा दौरा करावा. विजयेंद्र यांना योग्य पदाबाबत निर्णय घेण्याचे आश्‍वासन शहा यांनी येडियुराप्पा यांना दिले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT