चिकोडी : पुढारी वृत्तसेवा : बेकायदेशीरपणे दारू विक्री केलेल्या व्यक्तीला चिकोडी जेएमएफसी न्यायालयाने 3 वर्षांचा कारावास व 20 हजार रुपये दंड ठोठावला.
चिकोडी तालुक्यातील जैनापूर गावातील आनंद महादेव घरबुडे असे शिक्षा झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. 24 सप्टेंबर 2015 रोजी जैनापूर क्रॉसनजिक बेकायदेशीर दारू विक्री करीत असल्याच्या आरोपाखाली अबकारी खात्याचे उपनिरीक्षक व्ही. ए. कळीकदी यांनी त्याला अटक केली होती. तत्कालीन अबकारी उपनिरीक्षक डी. एन. मुब्रूमकल यांनी अंतिम आरोपपत्र सादर केले होते.
या प्रकरणाची सुनावणी करून न्यायालयाने कर्नाटक अबकारी कायदा 1965 चे कलम 32, 34 अनुासर आरोपी आनंद घरबुडे याला तीन वर्षाची शिक्षा व 20 हजार रुपये दंड ठोठावण्याचा आदेश दिला. सरकारच्या बाजूने सहायक सरकारी वकील अॅड. गंगाधर पाटील यांनी युक्तिवाद केला.