बेळगाव

चांगली फळे परदेशात, उरलेली आमच्या ताटात

अनुराधा कोरवी

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा : उन्हाळ्यामुळे बाजारात विविध रसाळ फळांची आवक वाढली आहे. किवी, ड्रॅगन फ्रूट, स्ट्रॉबेरी, ग्रीन सफरचंद अशी विविध रंगांची फळे लक्ष वेधून घेत आहेत. व्यापारी चांगल्या प्रतीची फळे परदेशात निर्यात करतात आणि दुय्यम दर्जाची फळे स्थानिक बाजारपेठेत विक्रीस आणत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे चांगली फळे परदेशात आणि उरलेली आमच्या ताटात असे चित्र आहे.

संत्री, मोसंबी, पपई, पेरू, चिकू, टरबूज, कलिंगड, केळी, सफरचंद ही फळे वर्षभर बाजारात उपलब्ध असतात. ही फळे राज्यातीलच असल्यामुळे त्याचे दरही कमी असतात. मात्र गेल्या काही वर्षांपासून परदेशी फळांनाही बाजारात मागणी वाढली असल्याचे चित्र आहे.
तंतूमय पदार्थांनी आणि खनिजांनी समृद्ध अशी किवी, ड्रॅगन फ्रुट, आंबा ही वैशिष्ट्यपूर्ण चांगल्या दर्जाची फळे परदेशात निर्यात केली जातात. त्यामुळे अशा प्रकारच्या फळांच्या निर्यातीला चांगली चालना मिळते. ही फळे महाग असल्याने सर्वसामान्यांना परवडतच नाहीत.

ही फळे परदेशातून येतात

सगळ्यांना आवडणारे पियर वॉशिंग्टन दक्षिण आफ्रिकेतून येतात. थायलंडहून ॲवाकॅडो, प्लम, ड्रॅगन फ्रुट, ब्लॅक चेरी ही फळे येतात. इराणवरून ग्रीन सफरचंद येते.

SCROLL FOR NEXT