बेळगाव : पुढारी वृत्तसेवा : केपीटीसीएल परीक्षा कॉपीप्रकरणी गोकाक पोलिसांनी बुधवारी आणखी तिघांना अटक केली. आतापर्यंत या प्रकरणी अटक झालेल्यांची संख्या ४८ झाली असून यामध्ये तिघी तरुणींचा समावेश आहे.
बुधवारी अटक केलेल्या संशयितांमध्ये आण्णाप्पा केंपाण्णा मारवाडी (वय ३१, रा. जनता प्लॉट, दळवाईनगर, मल्लापूर पीजी, ता. गोकाक ), जानराबर्ट यशवंत बंगेन्नवर (२६, रा. शिवापूर, ता. गोकाक) व चिदानंद चिन्नाप्पा माडलगी (२७, रा. राजापूर, ता. मुडलगी) यांचा समावेश आहे. हे तिघे संशयित ब्लूटूथ डिव्हाईस व मायक्रोचिपचा वापर करत दुसऱ्यांच्या नावे परीक्षेला बसले होते. त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता कारागृहात रवानगी झाली. या प्रकरणी काल मंगळवारीच तीन युवतींसह चौघांना अटक झाली होती.