बेळगाव

कर्नाटक विधान परिषद निकाल : काँग्रेसचे प्रकाश हुक्केरी, भाजपचे हनुमंत निराणी आघाडीवर

मोहन कारंडे

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : विधान परिषदेच्या वायव्य शिक्षक मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार प्रकाश हुक्केरी तर पदवीधर मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार हनुमंत निराणी सुरूवातीपासून आघाडीवर आहेत.

दुपारी साडेबारा पर्य़ंत शिक्षक मतदारसंघातील 21 हजार पैकी सुमारे सहा हजार मतमोजणी पूर्ण झाली आहे. तर 14 हजार मतमोजणी अजुन बाकी आहे. झालेल्या मतमोजणीमध्ये प्रकाश हुक्केरी यांनी भाजपचे उमेदवार अरुण शहापूर यांच्यावर 1 हजार 800 मतांची आघाडी मिळवली आहे. तर वायव्य कर्नाटक पदवीधर मतदार संघामध्ये भाजपचे हनुमंत निराणी आघाडीवर आहेत.

हेही वाचलंत का ?

SCROLL FOR NEXT