बेळगाव

आंब्यांवर रसायन, नऊजणांना नोटीस; बेळगाव फळमार्केटमधील प्रकार

दिनेश चोरगे

[web_stories title="true" excerpt="false" author="false" date="false" archive_link="true" archive_link_label="" circle_size="150" sharp_corners="false" image_alignment="left" number_of_columns="1" number_of_stories="10" order="DESC" orderby="post_date" view="circles" /]

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : आंबे पिकलेले व पिवळे भासण्यासाठी रासायनिक औषधांचा वापर केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार महामार्गाजवळील फळमार्केटमध्ये उघडकीस आला आहे. अन्न व औषध भेसळ विभागाचे अधिकारी जगदीश जिंगी यांनी फळ मार्केटला भेट देऊन पाहणी केली. दोषी आढळलेल्या 9 जणांना त्यांनी नोटीस बजावली आहे.

सध्या आंब्याचा हंगाम असून अनेकजण आंबे खरेदी करत आहेत. बाजारपेठेत अनेक ठिकाणी पिवळ्याधमक दिसणार्‍या आंब्याच्या पेट्या दिसत आहेत. 500 रूपयांपासून 2 हजारपर्यंत डझन, दिड डझनचा भाव सांगितला जात आहे. रूचकर आंबा आवडणार्‍या खवय्यांची कमी नाही. त्यामुळे खवय्ये आंबे आवडीने खरेदी करत आहेत. परंतु, ते खरेदी करताना सावधानता बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे. शहरातील फळ मार्केटमध्ये आंब्यांची आवक वाढली आहे. अधिकारी जिंगी यांनी येथे नुकतीच भेट देऊन काही फळ दुकानांची तपासणी केली. यावेळी काही घाऊक फळविक्रेते आंब्याला रंग चढण्यासाठी रसायनांचा वापर करत असल्याचे आढळून आले आहे.

[web_stories title="true" excerpt="true" author="true" date="true" archive_link="true" archive_link_label="" circle_size="150" sharp_corners="false" image_alignment="left" number_of_columns="1" number_of_stories="1" order="DESC" orderby="post_date" view="list" /]

अनेक बाबींची पाहणी

अधिकारी जिंगी यांनी येथे पाहणी केली असता अनेक दुकानांमध्ये स्वच्छता नाही, आंबा कृत्रिमरित्या पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाईडचा वापर करत आहेत. अन्य रसायनांचाही वापर करणार्‍या नऊ व्यापार्‍यांना जिंगी यांनी नोटीस बजावली आहे. जनतेने पिवळ्याजर्द रंगाला भुलून आंबा घेऊ नये. कारण, असे आंबे नैसर्गिक नव्हे, तर कृत्रिमरित्या पिकवले जात असल्याचा प्रकार समोर येत आहे. त्यामुळे जनतेने सावध राहून आंबे खरेदी करावी, असे आवाहन जिंगी यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT