बेळगाव

अथणी : पार्थनळ्ळीत पाय घसरून पडल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू

अनुराधा कोरवी

संबरगी ः पुढारी वृत्तसेवा : विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा पाय घसरून पडल्याने बुडून मृत्यू झाला. पार्थनळ्ळी (ता. अथणी) येथे ही घटना घडली. बाळेश रुकमव्वा कांबळे (वय 15) असे मृताचे नाव आहे.

दहावीत शिकणारा बाळेश सकाळी विहिरीत अंघोळीला गेला होता. अग्निशामक दलाचे जवान राजू तलवार, वाय. बी. पुजारी यांच्या पथकाने विहिरीतून मृतदेह बाहेर काढला. सरकारी रुग्णाललयात उत्तरीय तपासणी केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

SCROLL FOR NEXT