बेळगाव

बेळगाव : अथणीत घराची भिंत कोसळून युवकाचा मृत्यू

Arun Patil

संबरगी, पुढारी वृत्तसेवा : घराची भिंत कोसळल्याने दिव्यांग युवक ठार झाल्याची घटना अथणी शहरात घडली. काशिनाथ आप्पासाहेब सुतार (वय 23) असे मृताचे नाव आहे. गुरुवारी सकाळी अथणी शहरात घडली आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी, गेले चार दिवस सतत पाऊस पडत असल्याने जुन्या घरात गळती सुरू झाली होती. अचानक घराची भिंत कोसळल्याने काशिनाथ त्याखाली सापडून जागीच ठार झाला. त्याच्या पश्चात वडील, भाऊ असा परिवार आहे.

अथणी तालुक्यामध्ये ग्रामीण भागात गेले पाच दिवस झाले पाऊस सुरू असल्याने जुन्या घरांची पडझड होत आहे. घटनास्थळी काँग्रेसचे युवा नेते चिदानंद सवदी यांनी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले तसेच मदत देण्यात येईल, असे आश्वासन दिले. यावेळी सीपीआय रवींद्र नायकवडी रामनगौडा पाटील, विजय मंगसुळी आदी उपस्थित होते.

घराचे छत कोसळून वृद्धेचा मृत्यू

बेळगाव : मुसळधार पावसामुळे अनेक घरांचे नुकसान होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. घराचे छत कोसळून वृद्धेचा मृत्यू झाल्याची घटना बैलहोंगल तालुक्यातील बुडरकट्टी गावात घडली. इरम्मा पत्रेमनवर (वय 95) असे त्या वृद्धेचे नाव आहे. गेल्या चार दिवसांपूर्वी ही घटना घडली होती. या घटनेत 13 जण जखमी झाले होते. इरम्मा यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT