येळ्ळूर : स्वतःच पोलिसांनी येळ्ळूरच्या निष्पाप जनतेला अमानुष मारहाण करून नंतर त्यांच्यावरच तब्बल सात गुन्हे दाखल केले. त्या सातही गुन्ह्यांतून मराठी कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता झाली आहे. ही पोलिस खात्याला चपराक आहे, अशा प्रतिक्रिया मराठी भाषिकांतून व्यक्त होत आहेत. न्यायालयाकडून न्याय मिळाल्या, अशाही प्रतिक्रिया अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.
सात वेगवेगळे गुन्हे दाखल झाल्यानंतर तब्बल बारा वर्षे सुनावण्या सुरु होत्या. त्यांची बाजू ॲड. शामसुंदर पत्तार, ॲड. श्याम पाटील, ॲड. हेमराज बेंचन्नावर यांनी मांडली. महत्त्वाचे म्हणजे त्यांनी यासाठी एक रुपयाही शुल्क घेतले नाही.
विना शुल्क वकिलानी येळूरच्या जनतेला मिळवून दिला न्याय येळ्ळूरच्या जनतेवर पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केले. यामुळे संपूर्ण सीमा भागातून संतापाची लाट उसळली होती. या अन्यायाविरुद्ध राष्ट्रीय मानव हक्क आयोगाकडेही दाद मागण्यात आली आहे.