बेळगाव

शिरगुप्पी येथे वर्कशॉपला शॉर्टसर्किटने आग, 48 लाखाचे नुकसान

Shambhuraj Pachindre

अंकली; पुढारी वृत्तसेवा : शिरगुप्पी येथील बसस्थानक परिसरात असलेल्या शिवशक्ती टायर्स अलाइनमेंट वर्कशॉपला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. ही घटना आज (दि.31) घडली. या घटनेत वर्कशॉपमध्ये असलेल्या किमती मशिनरी व दोन मारुती ओमनी कार जळून खाक झाल्या आहेत. त्यामुळे सुमारे 48 लाख रुपयांचे नुकसान झाले.

शिवशक्ती टायर्स अलाइनमेंटचे वर्कशॉप इंगळी येथील माळी बंधू यांचे असून सकाळी १० वाजण्याच्या सुमारास शिरगुप्पी बसस्थानक परिसरात असलेल्या या वर्कशॉपला शार्टसर्किटने आग लागली. आग विझविण्यासाठी चिकोडी, उगार, चिदानंद कोरे सहकारी साखर कारखाना व उगार शुगर येथील अग्निशामक दलाना माहिती देण्यात आली.

आज सकाळी 10 च्या सुमारास इंगळी येथील शिरगुप्पी बसस्थानक परिसरात असलेल्या शिवशक्ती टायर्स अलाइनमेंट वर्कशॉपला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. या घटनेची माहिती मिळताच चिकोडी, उगार, चिदानंद कोरे सहकारी साखर कारखाना व उगार शुगर येथील अग्निशामक दल आगविझवण्यासाठी दाखल झाले.

शर्थीचे प्रयत्न करून अग्निशामक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. आगीने रौद्ररूप धारण केल्याने वर्कशॉपचे मोठे नुकसान झाले आहे. घटने दरम्यान वर्कशॉपचे दरवाजे बाहेरून बंद होते. त्यामुळे दरवाजे उघडण्यासाठी नागरिकांची एकच तारांबळ उडाली. दरवाजे न उघडल्याने वर्कशॉपमधील साहित्य जळून खाक झाले. घटनास्थळी ग्रामविकासाधिकारी, कागवाड पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक व कर्मचाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. या घटनेची नोंद कागवाड पोलिस ठाण्यात झाली असून पुढील तपास सुरू आहे.

SCROLL FOR NEXT