Accident Pudhari
बेळगाव

Belgaum Accident: दुचाकीवरुन कोसळली; ट्रकखाली सापडली

पदर चाकात अडकल्याने अपघात : महिलेचा मृत्यू

पुढारी वृत्तसेवा

गोकाक : दुचाकीवरुन पडलेली महिला ट्रकच्या मागील चाकाखाली सापडून जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी (दि. 21) सायंकाळी घटप्रभानजीकच्या धुपदाळ येथे घडली आहे. तर दुचाकीस्वार जखमी झाला आहे. ललिता भिमप्पा नायक (वय 45, रा. बडीगवाड, ता. गोकाक) असे मृत महिलेचे नाव असून ती ग्राम पंचायतीची माजी अध्यक्षा होती.

याप्रकरणी मिळालेली अधिक माहिती अशी, गोकाक फॉल्सकडून दुचाकीवरुन घटप्रभामार्गे बडीगवाडकडे पती-पत्नी जात असताना कोण्णूर गावाकडून घटप्रभाकडे मालवाहू ट्रक जात होता. धुपदाळमधील दोन्ही मार्गाच्या चौकात अचानक जोरदार वारे आल्यामुळे मागे बसलेल्या ललिता यांचा पदर मागील चाकात सापडल्यामुळे त्या दुचाकीवरुन कोसळल्या. याचवेळी कोण्णूरकडून घटप्रभाकडे जाणाऱ्या मालवाहू ट्रकच्या मागील चाकाखाली सापडून मृत्यू झाला.

ट्रकचालक न थांबता वेगात जात असताना ग्रामस्थांनी पाठलाग करुन त्याला थांबविले. तसेच घटप्रभा पोलिस ठाण्यात घटनेची माहिती दिली. अपघात घटनेतील ट्रक हुक्केरी तालुक्यातील निडसोसीतील असून चालक अडवेप्पा काडदेवरमठ याच्या विरोधात पती भिमप्पा नायक यांनी घटनेप्रकरणी तक्रार दाखल केली. असून घटप्रभा पोलिस अधिक तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT