Accident  Pudhari
बेळगाव

Vijapur Accident: अपघातात पोलिस विभागातील जीएचओ ठार

ताळिकोटजवळ कारची झाडाला धडक; मुलगी, एएसआय गंभीर

पुढारी वृत्तसेवा

विजापूर : हैदराबादहून मुलीला घेऊन ताळिकोटमार्गे बागलकोटकडे येत असताना ताळिकोटजवळ कार झाडाला धडकल्याने बागलकोट जिल्हा पोलिस कार्यालयात जीएचओ म्हणून कार्यरत निसारहमद अब्दुलरजाक हिप्परगी (वय ५०) यांचा मृत्‍यू झाला. सोमवारी पहाटे सुमारे २ च्या सुमारास हा अपघात घडला.

हिप्परगी यांनी मुलगी नेहा हिला आयपीएस कोचिंगसाठी हैदराबाद येथे सोडले होते. कोचिंग व आयपीएस परीक्षा संपल्यानंतर ते मित्र बसवराज सोना यांच्यासह मुलगी नेहाला घेऊन परत येत होते. ताळिकोटजवळील वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने कार रस्त्याच्या उजव्या बाजूला असलेल्या झाडाला जोरात धडकली. या अपघातात निसारहमद हिप्परगी यांचा जागीच मृत्यू झाला. त्‍यांची मुलगी नेहा (वय २२) तसेच निसारहमद यांचे मित्र आणि पोलिस विभागातील एएसआय बसवराज सोना (वय ५१) हे गंभीर जखमी झाले असून त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत मृताचे जावई अजीजहमद कुडची यांनी ताळिकोट पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. घटनास्थळी डीवायएसपी चंद्रकांत नंदरेड्डी, सीपीआय महमद पसीउद्दीन, उपनिरीक्षक ज्योती खोत तसेच गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक एस. एम. पडशेट्टी यांनी भेट देऊन पुढील तपास सुरू केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT