अपघातात मृत्यूमुखी पडलेले तरुण Pudhari Photo
बेळगाव

बेळगाव : कोल्हापूरहून-मुधोळकडे जाणाऱ्या वाहनाचा अपघात; 2 ठार तर 4 जखमी

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर येथे गणेश मूर्तीची ऑर्डर देऊन मुधोळकडे जाणाऱ्या कारचा अपघात झाला. या अपघातात कार - मालवाहू वाहनाची समोर धडक झाल्याने दोन तरुण ठार तर चार जण जखमी झाले. ही घटना चिकोडी तालुक्यातील बेळकुड क्रॉसवर घडली. सौरभ संजू कुलकर्णी (वय. 22) आणि राकेश सुरेंद्र वाडकर (वय.23) दोघे राहणार मुधोळ असे अपघातात ठार झालेल्या दुर्दैवी तरुणांची नावे आहेत.

याबद्दल अधिक माहिती अशी की, मुधोळ येथील चार जण युवक कारने गणेश मूर्तीची ऑर्डर देण्यासाठी कोल्हापूरला गेले होते. कोल्हापूर येथे गणेश मूर्तीची ऑर्डर देऊन मुधोळकडे परत जात असताना रात्रीच्या वेळी चिकोडी तालुक्यातील बेळकुड क्रॉस नजीक निपाणी महालिंगपूर राज्य महामार्गावर समोरून येणाऱ्या वाहनाची त्यांच्या वाहनाला जोराची धडक बसली.

अपघातात दोन युवकांचा मृत्यू

मुधोळकडे जाणाऱ्या कारमधील आनंद घाटगे विकास बेळगी आणि वाहनातील सुभाष बजंत्री, त्याची पत्नी रेणुका बजंत्री दोघे राहणार चिकोडी हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मयत तरुणांची उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. याप्रकरणी चिकोडी रहदारी पोलीस स्थानकात घटनेची नोंद झाली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT