चिकोडी, अथणी : उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात शुक्रवारी खासगी हेलिकॉप्टर कोसळून सहाजणांचा मृत्यू झाला. जोशीमठाजवळील खोऱ्यात खराब हवामानामुळे हा अपघात घडला. पाचजण कर्नाटकातील असून, त्यात अथणी तालुक्यातील आरटाळ गावचे रहिवासी असलेल्या पोलिस निरीक्षकाचा समावेश आहे.
हिमांशू (वैमानिक), अरुण साळुंखे (सीसीबी पोलिस निरीक्षक वय ३८, आरटाळ, ता. अथणी) के. सुधीर (वकील, बंगळूर), शंकरेगौडा (वकील, बंगळूर), एच. एस. नटराज (वकील, बंगळूर), प्रताप (बंगळूर) अशी मृतांची नावे आहेत. साळुंखे हे त्यांचे मित्र सुधीर, शंकरेगौडा, एच. एस. नटराज आणि प्रताप यांच्यासोबत उत्तराखंड दौऱ्यावर गेले होते. बद्रीनाथ धामचे दर्शन घेऊन परतत असताना जोशीमठाजवळ त्यांच्यावर काळाने घाला घातला.