अंकली, पुढारी वृत्तसेवा : प्रयागराजमधील कुंभमेळ्याला जाताना गुजरातमधील पोरबंदर येथे सोमवारी (दि.२४) मध्यरात्री विजापूर जिल्ह्यातील चडचण येथील भाविकांच्या वाहनाचा अपघात झाला. यात दोन भाविकांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर भाविक गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विश्वनाथ अऊजी (वय ५५) व मल्लिकार्जुन सदलगे (वय ४०) असे मृत भाविकांचे नावे आहे. दोघे जखमी भाविक विजापूर जिल्ह्यातील चडचण येथील रहिवासी आहे.
विजापूर जिल्ह्यातील चडचण येथील १७ भाविक प्रवासी वाहनातून प्रयागराज येथील कुंभमेळ्याला जात असताना गुजरातमधील पोरबंदर येथे रस्त्याच्या कडेला थांबलेल्या कंटेनरला जोराची धडक दिली. यात धडकेत दोघा भाविकांचा जागीच मृत्यू झाला. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे गुजरात पोलिसांकडून कळवण्यात आले आहे.