Jewellery Shop Robbery File Photo
बेळगाव

Athani jewellery shop robbery: सराफी दुकान लूटणाऱ्या दोघांना अटक

विजापूर पोलिसांची कारवाई : सोने-चांदीसह, गावठी पिस्तुल, काडतूस जप्त

पुढारी वृत्तसेवा

अथणी : पिस्तुलचा धाक दाखवत सराफी दुकानावर दरोडा टाकून 22 लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना कर्नाटक-महाराष्ट्राच्या सीमेवरील हलसंगी (ता. इंडी, जि. विजापूर) येथे घडली होती. झळकी पोलिस स्टेशनच्या व्याप्तीमध्ये जानेवारी महिन्यात घडलेल्या या घटनेत 205 ग्रॅम सोने व एक किलो चांदी लंपास करण्यात आली होती. पोलिसांनी याप्रकरणी तपासासाठी दोन पथके केली होती.

पोलिसांनी दोघांना गजाआड केले असून त्यांच्याकडून सोने, चांदी, दुचाकी, तीन गावठी पिस्तुले, 26 काडतूस जप्त केली आहेत. असल्याची माहिती विजापूर जिल्हा पोलिस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी दिली आहे. दोघेही मूळचे संख (ता. जत) येथील असून हनुमंत मल्लाप्पा वाघोली (वय 28), शिवराज रावसाहेब नावी (वय 25) अशी त्यांची नावे आहेत. जानेवारी महिन्यामध्ये हलसंगी येथील एका सराफी दुकानावर दरोडा टाकून त्यांनी 22 लाखाचा ऐवज लंपास केला होता. यावेळी व्हिडिओ करणाऱ्या एका व्यक्तीच्या पायावर गोळ्या झाडून ते मोटारसायकलवरून फरारी झाले होते. विजापूर पोलिसांनी तपास करून त्यांना अटक केली आहे.

ते चालक म्हणून काम करत होते. एकमेकांच्या संगनमताने त्यांनी दिवसाढवळ्या दरोडा टाकून पलायन केले होते. विजापूर जिल्हा पोलिसांनी शिताफीने तपास करून त्यांना अटक केली. त्यांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी दरोडा घातल्याचे कबूल केले. त्यांच्याकडून सोने, चांदी, दुचाकी, तीन गावठी पिस्तुले, 26 काडतूस जप्त केली आहेत.

पोलिस पथकाने तब्बल वीस दिवस तपास केल्यानंतर संशयितांना अटक करण्यात यश आले आहे. अतिरिक्त जिल्हा पोलिस प्रमुख रामनगौडा, विजापूर शहराचे डीवायएसपी सुनील कांबळे, इंडीचे डीएसपी सदाशिव खट्टीमणी यांच्या नेतृत्वाखाली पथकाने त्यांना गजाआड केले. जिल्हा पोलिस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी या पथकातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. याप्रकरणी झळकी पोलिस ठाण्यामध्ये प्रकरण दाखल करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT