जमखंडी ः पादचार्याला धडक देऊन रस्त्यावर कोसळलेल्या दुचाकीवरील तिघा विद्यार्थ्यांना ट्रकने चिरडले. त्यात तिघेही जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी (दि. 8) बागलकोट जिल्ह्यातील सिमिकेरीजवळ घडली. सिद्धू (वय 16), संतोष (वय 16) व कामण्णा (वय 16, तिघेही रा. मुरनाळ) अशी मृतांची नावे आहेत.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, बागलकोट जिल्ह्यातील सिमिकेरीतील बायपास रस्त्यावरून तिघे विद्यार्थी दुचाकीवरुन जात होते. प्रथम त्यांनी पादचार्यांना धडक दिली. त्यामुळे, तोल जाऊन तिघेही दुचाकीसह रस्त्यावर कोसळले. त्याचवेळी मागून येणार्या ट्रकखाली तिघेही चिरडले गेले.
तिघेही मुरनाळ गावचे असून ते माध्यमिक शाळेचे विद्यार्थी असल्याचे कळते. अपघाताची नोंद कलादगी पोलिस ठाण्यात झाली आहे. अपघाताचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाले असून पोलिस पुढील तपास करत आहेत.