दै. ‘पुढारी’चा आज वर्धापनदिन Pudhari File Photo
बेळगाव

दै. ‘पुढारी’चा आज वर्धापनदिन

वाचकांशी गेली 86 वर्षे आपुलकी आणि जिव्हाळ्याचे अतुट नाते

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : सीमाभागातील जनतेच्या मनात अढळ स्थान निर्माण केलेले, वाचकांशी गेली 86 वर्षे आपुलकी आणि जिव्हाळ्याचे अतुट नाते जपलेले दैनिक ‘पुढारी’ बुधवारी (दि. 1) 87 व्या वर्षात पदार्पण करत आहे. बेळगाव ‘पुढारी’च्या वर्धापन दिनानिमित्त गोगटे रंगमंदिराजवळ, शंभू जत्ती मंदिराशेजारी शानभाग हॉल येथे सकाळी 10.30 ते दुपारी 2 या वेळेत स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. निपाणीतही स्नेहमेळाव्याचे आयोजन चिकोडी रोड येथील ब्रह्मनाथ सभागृहात सकाळी 10 ते 2 या वेळेत करण्यात आले आहे. ‘पुढारी’चे वाचक, जाहिरातदार, हितचिंतकांनी बेळगाव आणि निपाणीतील स्नेहमेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन ‘पुढारी’ परिवारातर्फे करण्यात आले आहे.

निःपक्ष व निर्भीड विचारांचा देदीप्यमान कृतिशील वारसा जपत, वाचकांच्या भक्कम साथीने दै. ‘पुढारी’ने 86 वर्षांची वाटचाल पूर्ण केली आहे. बेळगावकरांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेल्या ‘पुढारी’च्या वर्धापन दिनाचा सोहळा म्हणजे आनंदाचा आणि कौटुंबिक सोहळाच आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न असो किंवा सामान्य लोकांवर झालेला अन्याय असो ‘पुढारी’ने नेहमीच आवाज उठवला आहे. सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यात ‘पुढारी’ नेहमीच अग्रभागी राहिला आहे. त्यामुळेच ‘पुढारी’ने सीमावासीयांच्या मनात स्थान मिळवले आहे. केवळ दैनिकच नव्हे तर ऑनलाईन, टोमॅटो एफएम आणि पुढारी न्यूज चॅनेलमुळे ‘पुढारी’ परिवार हा संपूर्ण वृत्तसमूह ठरला आहे. या स्नेहमेळाव्याला राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सहकार, आरोग्य, कला, क्रीडा, उद्योग अशा विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात अगत्यपूर्वक सहभागी व्हावे, असे कळविण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT