Pudhari
बेळगाव

Belgaum fire incident: टिळकवाडीत ई-स्कूटर शोरूमला आग

बॅटरी स्फोटाचा प्राथमिक अंदाज

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : खानापूर रोडवरील टिळकवाडी परिसरातील आश्रय एम्पायरसमोरील गोल्डन मोटर्स या विद्युत दुचाकी विक्रीच्या दुकानाला शनिवारी पहाटे अचानक आग लागल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, पहाटे फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांच्या सतर्कतेमुळे आणि अग्निशामक दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला.

शनिवारी पहाटे सुमारे साडेपाचच्या दरम्यान काही नागरिकांना दुकानातून धूर बाहेर येताना दिसला. सुरुवातीला किरकोळ धूर असल्याचे वाटले; मात्र काही वेळातच धुराचे प्रमाण वाढू लागल्याने नागरिकांनी तत्काळ अग्निशामक दलाशी संपर्क साधला. त्याचबरोबर दुकानावरील संपर्क क्रमांकावर फोन करून दुकानमालक गावडे यांनाही घटनेची माहिती देण्यात आली.

दुकानमालक घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी पोहोचून तातडीने पाण्याचा मारा सुरू केला. काही काळानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT