बेळगाव : दीर्घकाळापासूनच्या मागणीला प्रतिसाद देत दक्षिण मध्य रेल्वेने बेळगाव व तेलंगणामधील रेल्वे जाळे अधिक मजबूत केले आहे. हैदराबाद, सिकंदराबाद व चर्लपल्ली येथून बेळगावसाठी तीन नवीन साप्ताहिक एक्सप्रेस रेल्वे सुरू केल्या आहेत.
तिन्ही रेल्वे बेगमपेट, लिंगमपल्ली, विकाराबाद, तंदूर, यादगिरी, रायचूर, मंत्रालयम रोड, अदोनी, गुंटकल, बळ्ळारी, होसपेट, कोप्पळ, गदग, हुबळी, धारवाड, लोंढा व खानापूर या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबणार आहेत. या नवीन रेल्वेमुळे बेळगाव व कारवारच्या रहिवाशांनातेलंगणाशी सुलभरित्या संपर्क साधता येणार आहे.
हैदराबाद - बेळगाव एक्सप्रेस
हैदराबाद-बेळगाव साप्ताहिक एक्सप्रेस २१ मेपासून धावणार आहे. रेल्वे क्रमांक १७०७१ दर गुरुवारी दुपारी ४.३० वा. हैदराबादहून सुटणार असून दुसऱ्या दिवशी सकाळी १०.३० वा. बेळगावला पोहचणार आहे. रेल्वे क्रमांक १७०७२ ही रेल्वे येत्या १५ मेपासून धावणार आहे. दुपारी १ वा. बेळगावहून निघू्न दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वा. पोहचणार आहे.
सिकंदराबाद - बेळगाव एक्सप्रेस
ही साप्ताहिक एक्सप्रेस सेवा १८ मेपासून सुरू होणार आहे. रेल्वे क्रमांक १७०७३ ही रेल्वे दर सोमवारी दुपारी ४.३० वा. सिकंदराबादहून सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी १०.३० वा. बेळगावला पोहचणार आहे. तर रेल्वे क्रमांक १७०७४ दर मंगळवारी दुपारी १ वा बेळगावहून सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ७.१५ वा. सिकंदराबादला पोहोचणार आहे.
चर्लपल्ली - बेळगाव एक्सप्रेस
ही साप्ताहिक एक्सप्रेस रेल्वे १६ मेपासून धावेल. रेल्वे क्रमांक १७०७५ दर शनिवारी दुपारी ४ वा. चर्लापल्लीहून सुटून रविवारी सकाळी १०.३० वा. बेळगावला पोहचणार आहे. रेल्वे क्रमांक १७०७६ दर रविवारी दुपारी १ वा. बेळगावहून सुटून सोमवारी सकाळी ८.४५ वा. चर्लापल्लीला पोचणार आहे.