Vehicle theft: चोरीच्या तेरा दुचाकी जप्त Pudhari
बेळगाव

Belagavi Vehicle theft: चोरीच्या तेरा दुचाकी जप्त

दोघांना अटक : एपीएमसी पोलिसांची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : शहर परिसर व जिल्ह्यातील काही ठिकाणांहून दुचाकी चोरणाऱ्या जोडगोळीला एपीएमसी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून तब्बल 13 दुचाकी जप्त केल्या असून, याची किंमत साडेपाच लाख रुपये होते.

उमेश हणमंत बागेवाडी (वय 33, रा. घटप्रभा रोड बेल्लद बागेवाडी, ता. हुक्केरी) व मौला हसनसाब हलकर्णी (वय 48, रा. गुडस, ता. हुक्केरी) अशी संशयितांची नावे आहेत. गस्तीवर असताना एपीएमसी पोलिसांनी संशयावरून उपरोक्त दोघांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता दोघांनी विविध कंपन्यांच्या तेरा दुचाकी चोरल्याचे स्पष्ट झाले. यामध्ये अकरा हिरो स्प्लेंडर प्लस दुचाकी असून उर्वरित दोन दुचाकी हिरो एचएफ डिलक्स आहेत. याची एकूण किंमत 5 लाख 35 हजार रूपये होते.

मार्केटचे एसीपी संतोष सत्यनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली एपीएमसीचे निरीक्षक उस्मान आवटी, उपनिरीक्षक एस. आर. मुतत्ती, एम. ए. पाटील, डी. सी. सागर, बसवराज नरगुंद, खादरसाब खानम्मनवर, गोविंदप्पा पुजार, रफिक मुजावर, रमेश पाटील, आनंद पवार, तांत्रिक विभागाचे रमेश अक्की, महादेव काशीद यांनी ही कारवाई केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT