निपाणी : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर तवंदी घाट येथे बंगळूर येथून शिरोलीकडे जाणाऱ्या कंटेनर चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनर रस्त्याच्या बाजूला असलेल्या कठड्यावर चढला. चालक इराप्पा (वय ३५) रा. कोप्पळ याने प्रसंगावधान राखल्याने जीवितहानी टळली. हा अपघात सोमवारी सायंकाळी झाला.
चालक इरापा हा बंगळूर येथून खासगी वाहतूक कंपनीच्या कंटेनरमधून पार्सल घेऊन शिरोली कोल्हापूरकडे जात होता. हा कंटेनर घाटातील व्हाईट हाऊससमोरील उतारावर आला असता ब्रेक निकामी झाला. त्यामुळे वाहनावरील ताबा सुटल्याने चालकाने कंटेनर रस्त्याच्या बाजूला घेतला. मात्र यावेळी कट्ट्यावर कंटेनर चढला. यावेळी कंटेनरच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले. घटनास्थळी रस्ते देखभाल अवताडे कंपनीच्या भरारी पथकाचे निरीक्षक संतराम माळगे यांच्यासह शहर पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली.