Stray Dogs Pudhari
बेळगाव

Stray dogs: मोकाट कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाला अखेर प्रारंभ

तीन दिवसांत 16 कुत्र्यांची नसबंदी : हिरेबागेवाडी येथे शस्त्रक्रिया

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : शहरात पुन्हा मोकाट कु्‌‍त्र्यांचा उपद्रव वाढला असून लोकांचा महापालिकेवर रोष वाढल्यामुळे अखेर चार महिन्यांनंतर निर्बीजीकरण मोहिमेला सुरूवात करण्यात आली आहे. हिरेबागेवाडी येथे शस्त्रक्रिया करण्यात येत असून तीन दिवसांत 16 मोकाट कुत्र्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आली.

शहरातील मोकाट कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाची मोहीम ऑक्टोबर महिन्यापासून रखडली होती. दरम्यान या काळात शहरात कुत्र्यांचे हल्ले वाढले होते. या हल्ल्यांत अनेकजण जखमी झाले आहेत. त्यामुळे कुत्र्यांची समस्या तत्काळ सोडविण्यात यावी, अशी मागणी होत होती. हिरेबागेवाडी येथे दोन एकर जागेत निवारा शेड आणि निर्बीजीकरण केंद्र सुरू केले आहे. या केंद्राचे अजूनही काम सुरू आहे. पण, कुत्र्यांचे हल्ले वाढले असल्यामुळे लोकांच्या दबावामुळे महापालिकेने अखेर केंद्र सुरू केले आहे. पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या या मोहिमेत केवळ शस्त्रक्रियाच नव्हे तर कुत्र्यांना अँटी-रेबीज लसीकरणही करण्यात येत आहे. यामुळे शहरात रेबीजसारख्या गंभीर आजाराचा धोका कमी होण्यास मदत होणार आहे.

महत्त्वाचे म्हणजे, कुत्र्यांची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांना निर्बीजीकरण आणि लसीकरण अनिवार्य आहे. मात्र, प्रत्यक्षात केवळ शस्त्रक्रिया सुरू असून फीडिंग झोन अर्थात कुत्र्यांना अन्न देण्यासाठी निश्चित क्षेत्रांची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. शहरातील अनेक भागांत कुत्र्यांच्या हल्ल्याच्या तक्रारी, लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण असताना ही मोहीम नियमित आणि व्यापक स्वरूपात राबवली गेली नाही, तर समस्या केवळ तात्पुरतीच आटोक्यात येईल, अशी चिंता व्यक्त होत आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT