बेळगाव

भाजपने लोकशाही गुंडाळली : सोनिया गांधी

दिनेश चोरगे

हुबळी; पुढारी वृत्तसेवा :  द्वेष पसरवणार्‍या आणि सरकारी खजिन्याची लूट करणार्‍या भाजपला सत्तेपासून दूर ठेवल्यानंतरच कर्नाटक आणि देशाचा विकास शक्य आहे. एकाधिकारशाही गाजवणार्‍या भाजपने लोकशाहीचे सर्व नियम धाब्यावर बसवून लोकशाहीच गुंडाळून ठेवली आहे, अशी टीका काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी केली.

काँग्रेस उमेदवार जगदीश शेट्टर यांच्या प्रचारसभेत सोनिया बोलत होत्या. त्या म्हणाल्या, भाजप सत्तेवर आल्यापासून सरकारी तिजोरी लुटली जात आहे. विरोधी पक्षांनी प्रश्न विचारले, तरी त्यावर उत्तर मिळत नाही. नियमानुसार सरकारला जाब विचारणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. काँग्रेसने सरकारच्या भ्रष्टाचाराविरुद्ध अनेकदा आवाज उठवला. पण, कोणत्याही वेळी सरकारकडून योग्य उत्तर मिळाले नाही.
भाजपने 'संकल्प यात्रा' हाती घेतली होती. पण त्यांच्याकडून केवळ द्वेष पसरवण्यात आला. या निवडणुकीत भाजपला जनता चांगलाच धडा शिकवेल. भाजपकडून सत्तेचा वारंवार गैरवापर करण्यात येत आहे. याचा जाब विचारणार्‍या काँग्रेसला वाईट ठरवले जात आहे. जनतेचा आवाज बनून लोकशाही व्यवस्थेनुसार सरकारला जाब विचारण्याचा अधिकार विरोधी पक्षांना आहे. पण, भाजपला आपल्या मनाप्रमाणे लोकशाही हवी आहे. सत्तेवर आल्यापासून अनेक तपास यंत्रणांचा गैरवापर केला आहे. विनाकारण चौकशीचा ससेमिरा लावून वरोधकांना त्रास देण्याचे काम भाजप करत असल्याचा आरोपही सोनियांनी केला.

SCROLL FOR NEXT