Father murder case | कामुक बापाचा मुलाने करवला खून; महिलांसह सुनेशीही अनैतिक संबंध 
बेळगाव

Father murder case | कामुक बापाचा मुलाने करवला खून; महिलांसह सुनेशीही अनैतिक संबंध

दोन लाखांची सुपारी, 5 जणांना अटक

पुढारी वृत्तसेवा

धारवाड : पंच्याहत्तरी गाठल्यानंतरही महिलांशी अनैतिक संबंध ठेवणार्‍या तसेच सुनेवरही बलात्कार करणार्‍या कामुक बापाचा मुलानेच सुपारी देऊन खून करवल्याचे उघडकीस आले आहे. गोनल पम्पण्णा (वय 75, रा. गोनल, जि. यादगिर) असे मृत बापाचे नाव असून, नरसरेड्डी असे मुलाचे नाव आहे. ़त्यानेच खून घडवून आणला. त्यासाठी त्याने तिरुपतीच्या चौघांना सुपारी दिल्याचे उघड झाले आहे. मात्र खुनानंतर स्वतःच पोलिसांत जाऊन अज्ञातांनी खून केल्याची तक्रार नरसरेड्डीने दाखल केली होती. खुनाची घटना 12 मार्चरोजी घडली.

चार दिवसांनी पोलिसांना संशयितांना पकडण्यात यश आले. रमेश, जी. वीरेश, एम. वीरेश आणि कृष्टा (सर्व रा. तिरुपती) अशी खून करणार्‍यांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांना अटक केल्यानंतर खुनाचे कारण स्पष्ट झाले. मालमत्तेसाठी हा खून झाल्याचा पोलिसांना संशय होता. परंतु तपासादरम्यान मृत वडिलांच्या मोबाईल फोनमध्ये त्याचे महिलांसोबतचे अनेक फोटो सापडले.

पंपण्णाला तीन मुले. मात्र तो तीन मुलांसोबत गावात न राहता 15 वर्षांपासून शेतात रहायचा. त्याच्या नावावर 48 एकर शेती होती. पैकी तीन मुलांना प्रत्येक 4 एकर याप्रमाणे वाटणी देऊन 36 एकर जमीन त्याने स्वतःकडे ठेवली होती. त्याच्या पत्नीचे आठ वर्षांपूर्वी निधन झाल्यानंतर वासना शमवण्यासाठी तो स्त्रियांना पैसे देऊन झोपडीत बोलवत असे. त्याचप्रमाणे त्याने आपल्या सुनेलाही आपली शिकार बनवले होते. नरसरेड्डीला ही माहिती मिळाल्यानंतर तो प्रचंड संतापला आणि त्याने वडिलांना ठार मारण्याचा कट रचला. वासनांध वडिलांना वैतागलेल्या नरसरेड्डीने तिरुपतीच्या टोळीला 2 लाख रुपये देऊन हा खून घडवून आणला. नरसरेड्डीलाही अटक झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT