शिवानंद नीलण्णावर Pudhari
बेळगाव

Shivam Associates fraud case: शिवानंद नीलण्णावर याची जामिनावर सुटका

सोमवार दि. १६ रोजी रात्री हिंडलगा मध्यवर्ती कारागृहातून सुटका

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : शिवम असोसिएट्‍स कंपनीशी संबंधित फसवणूक प्रकरणात अटक करण्यात आलेल्‍या शिवानंद नीलण्णावर याची बंगळूर येथील ९२ व्या शहर दिवाणी व सत्र न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केल्यानंतर सोमवार दि. १६ रोजी रात्री हिंडलगा मध्यवर्ती कारागृहातून सुटका करण्यात आली.

माळमारुती पोलिसांनी १५ मे रोजी शिवानंद नीलण्णावर याला अटक केली होती. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला. जामीन अर्जावरील सुनावणीनंतर न्यायालयाने १२ जून रोजी अंतरिम जामीन मंजूर केला होता. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सोमवारी रात्री त्याची हिंडलगा कारागृहातून सुटका करण्यात आली.

तुरुंगातून बाहेर आल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शिवानंद नीलण्णावर याने मी असा व्यक्ती आहे जो सर्वांचे भले इच्छितो. यापलीकडे मी काहीही बोलणार नाही, अशी प्रतिक्रिया दिली.

दरम्यान, न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर करताना अनेक अटी घातल्या आहेत. त्यानुसार नीलण्णावर यांनी २७ जून रोजी न्यायालयात हजर राहणे बंधनकारक आहे. तसेच ३ लाख रुपयांचा वैयक्तिक जामीन, तितक्या रकमेचा एक जामीनदार सादर करणे, तपास अधिकाऱ्याला पूर्ण सहकार्य करणे आणि न्यायालयाच्या परवानगीशिवाय देशाबाहेर जाउ नये या अटींचा समावेश आहे. नीलण्णावर याच्यावतीने अ‍ॅड. आर. जी. पाटील यांनी काम पाहिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT