बेळगाव : बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील सरकारी, अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांना 20 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबरपर्यंत दसर्याची सुट्टी जाहीर करण्यात आले आहे. शिक्षण खात्याने यासंबंधीचा आदेश काढला आहे. पावसाळ्यातील सुटी भरुन काढण्यासाठी शैक्षणिक वर्षातील दुसर्या सत्रात शनिवारी पूर्ण दिवस शाळा भरवा, असेही या आदेशात म्हटले आहे.
दसर्यानिमित्त विद्यार्थ्यांना सुट्टी मिळाली असली तरी शिक्षकांनी सुट्टी असणार नाही. राज्य सरकार सोमवारपासून (दि. 22) जातनिहाय जनगणना हाती घेणार आहे. त्यामुळे, शिक्षकांना सुट्टीच्या काळात घरोघरी जाऊन सर्वेक्षण करावे लागणार आहे. सध्या जातगणनेला विरोधकांसह सत्ताधारी पक्षातूनही विरोध होत आहे. त्यामुळे, याबाबत संभ्रम असला तरी आदेश आल्यास 22 सप्टेंबरपासून 15 दिवस जातगणना करावी लागणार आहे.