Satish Jarkiholi Pudhari
बेळगाव

Satish Jarkiholi | केपीसीसी अध्यक्षपद समर्थपणे पार पाडेन : मंत्री सतीश जारकिहोळी

आजच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : राज्याच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडत आहेत. मुख्यमंत्री बदल आणि कर्नाटक प्रदेश काँग्रेस अध्यक्ष निवडीच्या हालचाली आहेत. अशातच सार्वजनिक बांधकाम तथा जिल्हा पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी आपल्याला प्रदेश काँग्रेस अध्यक्षपद मिळाल्यास जबाबदारी समर्थपणे निभावण्यात तयार आहे, असे मत व्यक्त केले आहे. ते बुधवारी (दि. २७) बंगळूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

ते म्हणाले, मुख्यमंत्री बदलाबाबत अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेले नाही. गुरुवारी (दि. २८) होणाऱ्या न्याहरी कार्यक्रमात याबाबत माहिती दिली जाण्याची शक्यता आहे. त्याठिकाणी मुख्यमंत्री सिद्धरामय्या काय सांगणार? हायकमांडचा काय निर्णय आहे? याबाबत मला काहीही माहिती नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

कर्नाटक प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदाबाबत चर्चा आहे. त्यावरही उद्याच्या न्याहरी कार्यक्रमात चर्चा होईल. पक्षाने कोणतीही जबाबदारी दिली तरी त्याला संमती दिलीच पाहिजे. आम्हाला अजून सांगितलेले नाही. आम्हाला विचारले तर अभिप्राय देण्यात येण्यात येईल. प्रदेशाध्यक्ष घेऊन मंत्रीपद सोडण्याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. पक्षाचा काय निर्णय आहे, हे आम्हाला माहिती नाही, असे त्यांनी सांगितले.

मी याआधीही प्रदेश काँग्रेस अध्यक्षपद मिळाले तर ते समर्थपणे पेलण्यात येईल, असे सांगितले आहे. पण, त्यावर अजून कोणतीही चर्चा झालेली नाही. आता घडामोडी सुरु आहेत. यामध्ये काय होतेय, ते पाहावे लागणार आहे. तरीही मी माझे मत हायकमांडला सांगणार आहे, असे मंत्री जारकिहोळी यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT