Satish Jarkiholi Pudhari
बेळगाव

Satish Jarkiholi | आधी केरळम् मुख्यमंत्री मग कर्नाटककडे लक्ष : मंत्री सतीश जारकीहोळी

मंत्रिमंडळ विस्ताराबाबतही निर्णय

पुढारी वृत्तसेवा

बंगळूर : केरळम्‌ मधील मुख्यमंत्री निवडीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, काँग्रेस हायकमांड कर्नाटकातील राजकीय घडामोडींवर लक्ष केंद्रित करेल, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी म्हटले आहे.

मंगळवारी पत्रकारांशी बोलताना जारकीहोळी म्हणाले, कर्नाटक काँग्रेसमधील नेतृत्वाबाबतचा संभ्रम पक्षश्रेष्ठी लवकरच दूर करतील. केरळममधील राजकीय घडामोडींनंतर, पक्षश्रेष्ठी राज्यातील काँग्रेस मंत्रिमंडळातील फेरबदल आणि नेतृत्वातील बदलांबाबत निर्णय घेतील. सत्तेच्या वाटपाबाबत स्पष्टता आणण्यासाठी आणि संभ्रम दूर करण्यासाठी पक्षश्रेष्ठींकडून त्वरित मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. तसेच नेतृत्वातील बदलांबाबतचा अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठींनीच घ्यावा, असेही मंत्री जारकीहोळी म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT