Satish Jarkiholi Pudhari
बेळगाव

Satish Jarkiholi: पालकमंत्री सतीश जारकीहोंळीनी दिलेला शब्द खरा केला

बागलकोट पोटनिवडणुकीची धुरा यशस्वी पेलली : उमेश मेटी यांचा दणदणीत विजय

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी अत्यंत चुरशीची ठरलेल्या बागलकोट पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार उमेश मेटी यांना विजयी करून, पक्षश्रेष्ठींना दिलेले वचन पूर्ण केले आहे. त्यामुळे जारकिहोळी यांचे पक्षात वजन वाढले आहे.

आज जाहीर झालेल्या पोटनिवडणुकीच्या निकालांमध्ये काँग्रेस उमेदवार उमेश मेटी विजयी ठरले आहेत. निवडणूक प्रचारादरम्यान, मंत्री सतीश जारकीहोळी हे गेल्या दोन महिन्यांपासून बागलकोट मध्ये तळ ठोकून होते. त्यांनी आखलेली रणनिती याठिकाणी यशस्वी ठरली. मंत्री सतीश जारकीहोळी यांनी यापूर्वीच वचन दिले होते की, आपण बागलकोटमध्ये नक्कीच विजयी होऊ. त्यानुसार, निकालांमध्ये उमेश मेटी यांनी २१,८६६ मतांच्या फरकाने विजय मिळविला आहे.

सतीश जारकीहोळी आजही अहिंद मतांची मोट बांधण्यात यशस्वी मानले जातात. गेल्या लोकसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई संसदेवर निवडून गेल्यामुळे शिगाव विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती; या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली तेव्हा, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मंत्री सतीश जारकीहोळी यांनीच हा मतदारसंघ जिंकण्याची जबाबदारी दिली होती. ती यशस्वीपणे पार पाडली होती. आता, काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी अशीच आणखी एक जबाबदारी त्यांनी यशस्वी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT