Sangli Jeweller Robbery | कर्नाटक-केरळ सीमेवर सांगलीच्या सराफाची लूट file photo
बेळगाव

Sangli Jeweller Robbery | कर्नाटक-केरळ सीमेवर सांगलीच्या सराफाची लूट

लग्नाहून केरळला परत जात असताना दरोडा

पुढारी वृत्तसेवा

बंगळूर : सांगली येथील विवाहसोहळा पार पाडून आपल्या कुटुंबीयांसह केरळमधील पय्यानूरला जात असताना विकास नामक सराफाची कार अडवून अज्ञात दरोडेखोरांनी हल्ला करून कारमधील सोन्याची पिशवी लांबविली. सोमवारी दुपारी २.३० च्या सुमारास बैकंपाडी जंक्शनजवळ कर्नाटक-केरळ सीमेवर घडली आहे.

विकास (मूळ सांगली, सध्या रा. पय्यानूर केरळ) नामक सोन्याचे व्यापारी आपल्या मित्राच्या सांगली येथील विवाह सोहळ्यात सहभागी होण्यासाठी सहकुटुंब आले होते. ते विवाहसोहळा आटोपून आपल्या कुटुंबासह केरळमधील पय्यानूरला आपल्या घरी कारने परत जात होते. काही अज्ञात दरोडेखोरांनी बैकंपाडीजवळ त्यांची कार अडवून त्यांच्यावर हल्ला केला व त्यांनी लग्नात वापरून एका पिशवीत ठेवलेले दागिने घेऊन ते पसार झाले. मूळचे सांगलीचे रहिवासी असलेले विकास व त्याचे कुटुंब अनेक वर्षांपासून केरळमधील कन्नूर जिल्ह्यातील पय्यानूर येथे वास्तव्य करून आहेत. ते मित्राच्या लग्नासाठी सांगलीला गेले होते. लग्न आटोपून परत घरी जात असताना ही घटना घडली. सांगली येथील लग्नसमारंभात त्यांनी घातलेले सोन्याचे दागिने एका पिशवीतून आणले जात होते. ती पिशवी दरोडेखोरांनी लांबविल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे. दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी पथके तयार करण्यात आली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT