बेळगाव

समाधीभूषण महाराजांना यमसल्लेखना व्रतावेळी समाधी

मोहन कारंडे

खडकलाट : पुढारी वृत्तसेवा : कोथळी- कुपानवाडी येथील आचार्य देशभूषण आश्रमाचे मुनिश्री समाधीभूषण महाराजांनी शुक्रवार, १७ रोजी यमसल्लेखना व्रत धारण केले होते. सोमवार, २० रोजी रात्री ९.३१ वाजता त्यांना समाधी मिळाली. त्यांचे वय ७९ होते. यमसल्लेखना धारण केलेल्या व्रतात चौथ्या दिवशी त्यांना समाधी मिळाली.

समाधीभूषण महाराजांनी २१ रोजी सकाळी कोथळी- कुपानवाडी येथील आचार्य देशभूषण आश्रमाचे मुनीश्री शांतीसेन महाराज, मुनीश्री पार्श्वसेन महाराज, जीनमती माताजी, भट्टारक महाराज, पंडीतगण व आचार्य देशभूषण आश्रम विश्वस्थ व श्राविकांच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. जैन धर्माचे सुक्षेत्र शांतिगिरीवर आचार्य देशभूषण आश्रमाचे शांतीसेन महाराज, मुनिश्री पार्श्वसेन महाराज व क्षुल्लिका जीनमती माताजी यांच्या आदेशानुसार समाधीभूषण महाराज यांनी यमसल्लेखन व्रत धारण केले होते. मुनीश्री शांतीसेन महाराज, मुनीश्री पार्श्वसेन महाराज, जीनमती माताजी, नांदती भट्टारक महाराज, पंडितगण व आश्रम विश्वस्थ व श्राविकांच्या उपस्थितीत मंगल विधीने अग्नी देण्यात आला.

SCROLL FOR NEXT