Electric Stoves Pudhari
बेळगाव

Electric stove demand: इलेक्ट्रिक, शेगडी स्टोव्हना वाढली मागणी

शहर परिसरातील चित्र : व्यावसायिक गॅस सिलिंडर टंचाईचा परिणाम

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : शहरात वाहनांसाठी मुबलक प्रमाणात इंधन व घरगुती ग्राहकांना गॅस सिलेंडर उपलब्ध होत आहे. पण, व्यावसायिक गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवत आहे. त्यावर पर्याय म्हणून इलेक्ट्रिक इंडक्शन, बायोगॅस प्रकल्प, सौर ऊर्जा कुकर आणि केरोसीन व डिझेलवर चालणारे स्टोव्हना मागणी वाढली आहे. सुरक्षितता आणि सहजतेसाठी इंडक्शन तर ग्रामीण भागात बायोगॅस आणि सौर ऊर्जा अधिक प्रभावी ठरत आहे. काही मोठी हॉटेल्स व खानावळींनीही लाकडाच्या चुलींचा पर्याय स्वीकारला आहे.

पूर्वी ग्रामीण भागात बायोगॅस प्रकल्पाचा वापर शेतकरी वर्ग करत होता. ग्रामीण भागात शेण आणि टाकाऊ पदार्थांपासून बायोगॅस तयार केला जायचा. कालांतराने ग्रामीण भागात घरगुती गॅस सिलिंडर मिळू लागल्याने बायोगॅस प्रकल्पाचा वापर कमी होत गेला. आता ते पुन्हा सुरु करण्यात येत आहेत. रॉकेल (केरोसीन) व डिझेलवर चालणारे स्टोव्ह गॅस टंचाईच्या वेळी उपयोगी पडत आहेत.

सोशल मीडियावर फेसबुक, इंस्टाग्राम, युट्युब, व्हॉट्स ॲपच्या माध्यमातून डिझेलवर चालणारे स्टोव्ह, वीजेवर चालणाऱ्या शेगड्या याची जोरदार जाहिरातबाजी सुरु आहे. प्रत्यक्षात ते साहित्य कोठे मिळते ते सांगितले जात नाही. केवळ फॉलोवर वाढविण्यासाठी अशा प्रकारच्या जाहिराती होत आहेत. अशी माहिती शहरातील गॅस स्टोव्ह विक्रेत्यांनी दिली.

व्यावसायिक गॅसचा पुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे, हॉटेल व्यावसायिकांचे गणित कोलमडले आहे. त्याचा परिणाम व्यवसायावर होत आहे. गॅस पुरवठा पूर्ण ठप्प न करता कमी प्रमाणात पुरवठा व्हायला हवा.
- विजय सालियान, अध्यक्ष, बेळगाव हॉटेल व्यावसायिक संघटना.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT