पावणेतीन लाखांचा रेशनचा तांदूळ जप्त Pudhari File Photo
बेळगाव

पावणेतीन लाखांचा रेशनचा तांदूळ जप्त

माळमारुती पोलिसांची कारवाई; संशयितावर गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : रेशनचा तांदूळ साठा करून वाहनातून त्याची विक्री करण्यासाठी नेताना पोलिसांनी छापा टाकून 2 लाख 75 हजार 600 रुपयांचा तांदूळ जप्त केला. याप्रकरणी एका संशयितावर गुन्हा दाखल केला आहे. माळमारुती पोलिसांनी शुक्रवार, दि. 18 रोजी सायंकाळी पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर ही कारवाई करण्यात आली असून, खळबळ उडाली आहे.

गोरगरीब जनतेसाठी सरकारने रेशनचे धान्य उपलब्ध करून दिले आहे. रेशनवर मोठ्या प्रमाणात तांदूळ वितरित करण्यात येत आहे. शहापूर येथील विनोद चौगुले या तरुणाने रेशनचा तांदूळ साठा करून ठेवला होता. त्याची विक्री करण्यासाठी वाहनातून तो नेत असताना पोलिसांनी ही कारवाई केली. माळमारुती पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची व त्यांच्या सहकार्‍यांनी ही कारवाई केली. मोठ्या प्रमाणात तांदूळ साठा जप्त करून चौगुले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिस पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT