Ramesh Jarkiholi son firing in Lakshmi Devi yatra
चिकोडी: गोकाक शहरात सुरू असलेल्या श्री लक्ष्मी देवीच्या यात्रेत माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांचा मुलगा संतोष जारकीहोळी याने हवेत गोळीबार केल्याची घटना घडली आहे. हातामध्ये बंदूक धरून यात्रेमध्ये पोलिसांच्या समोरच हवेत गोळीबार केला. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
यात्रेमध्ये भंडारा उधळणीच्या कार्यक्रमात लाखो लोक उपस्थित असताना माजी मंत्र्याच्या मुलाने हा प्रताप केला आहे. याचा सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत आहे. सदर घटना गोकाक शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. याप्रकरणी संतोष जारकीहोळी यांच्यावर गोकाक शहर पोलीस ठाण्यात आर्म्स ऍक्ट अंतर्गत सुमोटो गुन्हा दाखल केला असल्याची माहिती बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी दिली.
काही दिवसांपूर्वी बेळगाव जिल्ह्यातील कुडची येथे एका ग्रामपंचायत सदस्याने वाढदिवसानिमित्त मध्यरात्री हवेत गोळीबार केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता.