Ram Mandir Donation Pudhari
बेळगाव

B K Hariprasad: राम मंदिर चोरीतील २०० कोटी कर्नाटकात

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बी. के. हरिप्रसाद यांच्या आरोपानंतर मुख्यमंत्री म्हणतात, राज्यात जमवलेली देणगी पोचवलीच नाही!

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : अयोध्येतील राम मंदिरातील देणगी चोरीतील २०० कोटी रुपये कर्नाटकात आले असल्याचा खळबळजनक आरोप कर्नाटक प्रदेश काँग्रेस अध्यक्ष बी. के. हरिप्रसाद यांनी केला असतानाच, आता मुख्यमंत्र्यांन दुसरा बॉम्ब टाकला आहे. १९९१ साली कर्नाटकातून राम मंदिरासाठी जमवलेली देणगी राम मंदिर ट्रस्टकडे पोचलेलीच नाही, असे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी म्हटले आहे.

गुरुवारी सुवर्णसौधमध्ये पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, कर्नाटकातून लोकांनी जे पैसे देणगीरूपात राम मंदिरासाठी दिले होते, ते अयोध्येपर्यंत पोहोचलेच नाहीत. आता तर मंदिरातील गैरप्रकार देशासमोर आला आहे. त्यामुळे आम्ही खबरदारी म्हणून धर्मादाय खात्याच्या अखत्यारीतील सगळ्याच मंदिरांमध्ये सीसीटीव्ही सक्तीची केली आहे. पैशांची मोजणी असो वा मंदिराचे कोषागार, दोन्ही ठिकाणी सीसीटीव्ही बसवले जातील आणि त्यावर नजर ठेवण्याची जबाबदारी नजीकच्या पोलिस ठाण्याकडे दिली जाईल.

प्रदेशाध्यक्षांचा आरोप

राम मंदिरातील देणगी पेटीतील कोट्यवधी रुपयांच्या चोरीपैकी २०० कोटी रुपये कर्नाटकात आल्याचा आरोप कर्नाटकचे प्रदेशाध्यक्ष बी. के. हरिप्रसाद यांनी याआधी केला आहे. हरिप्रसाद यांच्या आरोपामुळे राज्यातील संघाच्या नेत्यांकडे संशयाची सुई फिरत आहे. राज्यातील एक प्रचारक राम मंदिर येथे कार्यरत आहेत. त्यांचा राम मंदिर व्यवस्थापनामध्ये महत्त्वाचा सहभाग आहे. तथापि, त्यांचे नाव न घेता हरिप्रसाद यांनी हा आरोप केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT