राकसकोप : गुरुवारी राकसकोप जलाशयातून मार्कंडेय नदीच्या पात्रात सुरू असलेला विसर्ग. 
बेळगाव

Belgaum News : राकसकोप जलाशयाची पातळी २,४७४ फुटांवर

बेळगावला पाच दिवसाआड पाणीपुरवठा सुरू

पुढारी वृत्तसेवा

राकसकोप : जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने बुधवारी रासकोप जलाशय तुडुंब झाले. दोन दरवाजे उचलून ४ इंच पाण्याचा विसर्ग मार्कंडेय नदीच्या पात्रात सुरु झाला. गुरुवारी पाण्याची पातळी २, ४७४ फुटांवर पोचली. त्यामुळे शहरात आठ दिवसाआड होणारा पाणीपुरवठा पाच दिवसाआडवर आला आहे.

९ जुलैरोजी जलाशयाची पातळी २,४५८.८० फुटांवर होती. गतवर्षी जुलै महिन्यात राकसकोप जलाशय तीनवेळा तुडुंब झाले होते. यंदा जलाशय भरण्यासाठी जुलै महिन्याचा शेवटचा आठवडा यावा लागला. बुधवारपासून राकसकोप जलाशयाचे दोन आणि पाच नंबरचे दरवाजे चार इंचांनी उचलून विसर्ग सुरु झाला आहे. गुरुवारी पाण्याची पातळी २,४७४ फुटांवर पोचली. गुरुवारी सकाळपासून पावसाने उसंत घेतली आहे. मात्र आजूबाजूचे नदी नाले प्रवाहीत झाल्याने राकसकोप जलाशयात पाण्याची आवक सुरु आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT