बेळगाव : कोल्हापूर आणि सांगलीतील तुफान प्रतिसादानंतर आता बेळगावकर पर्यटकांना देश-विदेशातील पर्यटनस्थळांची माहिती एकाच छताखाली मिळवून देण्यासाठी 'पुढारी टूर्स अँड ट्रॅव्हल्स एक्झिबिशन २०२६' सज्ज झाले आहे. या प्रदर्शनाबाबत लोकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. पर्यटन क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाचे मानले जाणारे 'गगन टूर्स' प्रस्तुत 'पुढारी टूर्स अॅन्ड ट्रॅव्हल्स एक्झिबिशन २०२६' पॉवर्ड बाय 'अ हेवन हॉलिडे'चे आयोजन शुक्रवारपासून (दि. २१) तीन दिवस मराठा मंदिरमध्ये करण्यात आले आहे.
शहर परिसरातील पर्यटकांना प्रतीक्षा असलेली 'टूर्स अँड ट्रॅव्हल्स एक्झिबिशन' बाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. बेळगावात दुसर्यांदा होत असलेल्या या पर्यटन एक्स्पोची जोरदार तयारी झाली असून सीमाभागातील लोकांना एकाच छताखाली पर्यटनविषयक सर्व माहिती आणि संधींचा खजिना उपलब्ध होणार आहे. हे प्रदर्शन म्हणजे भविष्यात राहणाऱ्या सुट्ट्यांचे नियोजन करण्यासाठी एक सुवर्णसंधी ठरणार आहे.
'नवीन वर्ष, नवीन दिशा अन् नवीन प्रवास' असा मंत्र जपत देश-विदेशातील स्वप्नवत पर्यटनस्थळांची सैर करण्याची, प्रवासाचे अचूक नियोजन करण्याची आणि पर्यटनावर मिळणाऱ्या सर्वोत्तम ऑफर्सचा 'ऑन दी स्पॉट' अनुभव घेण्याची ही सुवर्णसंधी ठरणार आहे. पुढील स्वप्नवत सहलींचे उत्तम व बजेटमध्ये नियोजन करण्यासाठी बेळगाव शहर आणि परिसरातील सर्व नागरिक व पर्यटनप्रेमींनी या प्रदर्शनाला मोठ्या संख्येने भेट द्यावी, असे आवाहन दैनिक 'पुढारी'ने केले आहे.
प्रदर्शनाची प्रमुख वैशिष्ट्ये व आकर्षणे
एकाच छताखाली संपूर्ण माहिती : देश-विदेशातील नामांकित आणि विश्वासू ट्रॅव्हल एजन्सीचे प्रतिनिधी थेट उपलब्ध.
विविध डेस्टिनेशन्स : काश्मीर, हिमाचल, केरळसारख्या अंतर्गत पर्यटनस्थळांपासून ते युरोप, स्वित्झर्लंड, बँकॉक-पट्टाया, दुबई यांसारख्या आंतरराष्ट्रीय ठिकाणांची परिपूर्ण माहिती.
खास पॅकेजेस व बंपर सवलती : कौटुंबिक सहली, सिनियर सिटीझन्स स्पेशल टूर्स, हनिमून पॅकेजेसवर विशेष सवलती, फायनान्स सुविधा आणि आकर्षक 'ऑन-द-स्पॉट' बुकिंग सवलती.
तज्ज्ञांचे थेट मार्गदर्शन : बजेटनुसार सहल कस्टमाईज करणे आणि टूर प्लॅनिंगसाठी ट्रॅव्हल तज्ज्ञांचे थेट मार्गदर्शन. 'पुढारी न्यूज', 'पुढारी ऑनलाईन', 'टोमॅटो एफएम' आणि 'टोमॅटो ब्रिगेड' यांच्या सहकार्यामुळे हा इव्हेंट पर्यटन क्षेत्रात अत्यंत विश्वासार्ह ठरला आहे.
'पुढारी'ने आयोजित केलेल्या या प्रदर्शनाचा लाभ ग्राहकांना नक्कीच होईल. हे प्रदर्शन ग्राहक आणि व्यावसायिक या दोघांसाठीही महत्वपूर्ण आहे. पर्यटकांना एकाच छताखाली अनेक पर्याय मिळतील आणि योग्य माहिती मिळेल. त्यामुळे 'पुढारी'चा उपक्रम बेळगावकरांसाठी उपयुक्त आहे.- डॉ. सोनाली सरनोबत, अध्यक्षा, नियती फाउंडेशन
प्रदर्शन दिनांक व स्थळ
दिनांक : २१, २२ आणि २३ ऑगस्ट २०२६
वेळ : सकाळी १०.०० ते रात्री ८.०० पर्यंत
स्थळ : मराठा मंदिर, खानापूर रोड, बेळगाव
अधिक माहितीसाठी संपर्क : ८१४९५८२४४२