Pudhari Tours and Travels Exhibition 
बेळगाव

Pudhari Tours and Travels Exhibition: पुढारी टूर्स अँड ट्रॅव्हल्स एक्झिबिशन २१ ऑगस्टपासून बेळगावात

कोल्हापूर, सांगलीतील तुफान प्रतिसादानंतर आता बेळगावकर पर्यटकांसाठी उघडणार जगभ्रमंतीचे दालन!

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : ‘नवीन वर्ष, नवीन दिशा अन् नवीन प्रवास’ असा मंत्र जपत देश-विदेशांतील स्वप्नवत पर्यटनस्थळांची सैर करण्याची, प्रवासाचे अचूक नियोजन करण्याची आणि पर्यटनावर मिळणाऱ्या सर्वोत्तम ऑफर्सचा ‘ऑन द स्पॉट’ अनुभव घेण्याची सुवर्णसंधी बेळगावकर पर्यटकांसाठी चालून आली आहे. कोल्हापूर आणि सांगलीत मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादानंतर, आता बेळगावात पर्यटनाचा भव्य उत्सव रंगणार आहे.

पर्यटन व्यवसाय क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाचे मानले जाणारे ‘गगन टूर्स’ प्रस्तुत ‘पुढारी टूर्स अँड ट्रॅव्हल्स एक्झिबिशन २०२६’ पॉवर्ड बाय ‘अ हेवन हॉलिडे’चे आयोजन शुक्रवार, (दि. २१) पासून बेळगावात करण्यात आले आहे. आपल्या पुढील स्वप्नवत सहलींचे उत्तम व बजेटमध्ये नियोजन करण्यासाठी बेळगाव शहर आणि परिसरातील सर्व नागरिक व पर्यटनप्रेमींनी या प्रदर्शनाला मोठ्या संख्येने भेट द्यावी, असे आवाहन दैनिक ‘पुढारी’च्या वतीने करण्यात आले आहे.

प्रदर्शनाची प्रमुख वैशिष्ट्ये व मुख्य आकर्षणे : एकाच छताखाली संपूर्ण माहिती : देश-विदेशांतील नामांकित आणि विश्वासू ट्रॅव्हल एजन्सींचे प्रतिनिधी एकाच ठिकाणी उपलब्ध.

विविध डेस्टिनेशन्स : काश्मीर, हिमाचल, केरळ यांसारख्या मनमोहक देशांतर्गत पर्यटनस्थळांपासून ते युरोप, स्वित्झर्लंड, बँकॉक-पट्टाया, दुबई यांसारख्या आंतरराष्ट्रीय डेस्टिनेशन्सची परिपूर्ण माहिती.

खास पॅकेजेस व बंपर सवलती: कौटुंबिक सहली, सीनिअर सिटीझन्स स्पेशल टूर्स, हनिमून पॅकेजेसवर विशेष सवलती, फायनान्स सुविधा आणि आकर्षक ‘ऑन-द-स्पॉट’ बुकिंग डिस्काऊंटस्‌

तज्ज्ञांचे थेट मार्गदर्शन : टूर प्लॅनिंग, प्रवास नियोजन आणि आपल्या बजेटनुसार सहल कस्टमाईज करून घेण्यासाठी ट्रॅव्हल तज्ज्ञांकडून थेट मार्गदर्शन.

पर्यटनप्रेमींच्या उदंड आणि उत्स्फूर्त प्रतिसादाची परंपरा जपणाऱ्या या उपक्रमाची बेळगावकर नागरिक आतुरतेने वाट पाहत असतात. ‘पुढारी न्यूज’, ‘पुढारी ऑनलाईन’, ‘टोमॅटो एफएम’ आणि ‘ टोमॅटो ब्रिगेड ‘ यांच्या व्यापक सहकार्यामुळे हा ट्रॅव्हल क्षेत्रातील अत्यंत विश्वासार्ह इव्हेंट ठरला आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क : ८१४९५८२४४२

प्रदर्शन दिनांक व स्थळ

दिनांक : २१, २२ आणि २३ ऑगस्ट २०२६

वेळ : सकाळी १०.०० ते रात्री ८.०० पर्यंत

स्थळ : मराठा मंदिर, खानापूर रोड, बेळगाव

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT