प्रियांका जारकीहोळींनी खासदारकीची शपथ घेतली  file photo
बेळगाव

प्रियांका जारकीहोळींनी घेतली खासदार पदाची शपथ

पुढारी वृत्तसेवा

चिकोडी : चिकोडी लोकसभा मतदारसंघातील विजयी उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांनी सोमवारी लोकसभेत खासदार पदाची शपथ घेतली. लोकसभेचे हंगामी सभापती भर्तृहरी महताब यांनी त्यांना शपथ दिली. खा. प्रियांका जारकीहोळी यांनी कन्नड भाषेत शपथ घेतली.

खा. जारकीहोळी म्हणाल्या, अत्यंत कमी वयात मला जनतेची सेवा करण्याची संधी लाभली आहे. काँग्रेसचे नेते खा. राहुल गांधी, अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार व पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत राहणार असून लोकसभा निवडणुकीत माझ्या विजयासाठी झटलेले नेते, कार्यकर्ते तसेच मतदारांचे आभार मानते. पुढील काळात चिकोडी लोकसभा मतदारसंघातील समस्या सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT