Karnataka HESCOM Maintenance  Pudhari
बेळगाव

Nipani Power Cut | निपाणीसह बेनाडी, खडकलाट परिसरातील वीजपुरवठा शनिवारी खंडित

हेस्कॉमचे मुख्य अभियंता सुरेश तहसीलदार व शहर अभियंता अक्षय चौगुला यांची माहिती

पुढारी वृत्तसेवा

Karnataka HESCOM Maintenance

निपाणी : निपाणी परिसरासह खडकलाट व बेनाडी येथील विद्युत पुरवठा केंद्रातील तांत्रिक दुरुस्तीसह केंद्राच्या परिघामध्ये मार्ग ग्राउंड वायर स्ट्रिंग कटिंग व ३ ठिकाणी टॉवर रिपेअरी करण्यात येणार आहे. त्यामुळे शनिवारी (दि. ३) सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत वरील विभागासह गावातील वीजपुरवठा खंडित राहणार असल्याची माहिती हेस्कॉमचे मुख्य अभियंता सुरेश तहसीलदार व शहर अभियंता अक्षय चौगुला यांनी दिली.

शनिवारी खडकलाट व निपाणी येथील ११० केव्ही वीजपुरवठा केंद्रातून होणारा ३३ केव्ही-१ मॅग्नम टफ, फेस २ बेनाडी तसेच ११ केव्ही मधून होणारा वीजपुरवठा शहरासह ग्रामीण भागात दुपारी ३ पर्यंत वीज पुरवठा खंडित राहणार आहे. तरी शेतकरी, ग्राहकांनी व सार्वजनिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन हेस्कॉमकडून करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT