बेळगाव : गांजा व खून प्रकरणी अटक केलेल्या संशयितासह सीसीबीचे निरीक्षक मंजुनाथ नाईक, उपनिरीक्षक मंजुनाथ बजंत्री व त्यांचे सहकारी. 
बेळगाव

Murder Accused Arrested | गांजाचा शोध घेताना खुनीही सापडला

सीसीबी पोलिसांची कारवाई; मच्छे भागातील खुनातील संशयित

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : बेकायदेशीर गांजा विक्री प्रकरणी एका तरुणाला पाळत ठेवून अटक करत त्याच्याकडून ८० हजार रूपये किमतीचा ७०४ ग्रॅम गांजा जप्त केला. परंतु, हाच तरुण एका खून प्रकरणातही संशयित असून फरारी होता. त्यामुळे दुहेरी गुन्ह्यात त्याला अटक केली. आकाश दिलीप दोड्डमनी (वय २८, रा. जयनगर, हुंचेनट्टी) असे संशयिताचे नाव आहे.

आकाश हा दुसरा संशयित कार्तिक (रा. कंग्राळी बुद्रूक) याच्याकडून गांजा घेऊन तो दुसऱ्याला विकण्यासाठी जात होता. याची माहिती सीसीबी पोलिस ठाण्याचे निरीक्षक मंजुनाथ नाईक यांना मिळाली. त्यांनी उपनिरीक्षक मंजुनाथ बजंत्री व अन्य सहकाऱ्यांसह छापा टाकला असता आकाश गांजासह सापडला. त्याच्याकडून गांजा जप्त केला.

काही दिवसांपूर्वी वडगाव पोलिस ठाणा हद्दीत एका तरुणाच्या खुनाची घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी आकाश याच्यावर खून व अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल आहे. याप्रकरणीही तो पोलिसांना हवा होता. सीसीबी पोलिसांनी त्याला अटक केल्याने आता दोन्ही गुन्ह्यांमध्ये त्याची चौकशी करण्यात आली. त्याला न्यायालयासमोर उभे केले असता त्याची हिंडलगा कारागृहात रवानगी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT