CM Siddaramaiah  Pudhari File Photo
बेळगाव

Karnataka CM tenure: पाच वर्षांहून अधिक काळ 'केवळ पाच'

सिद्धरामय्याच सर्वाधिक काळ मुख्यमंत्री, देवराज अर्स दुसऱ्या स्थानी

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : राज्याच्या राजकारणात आपला स्वतंत्र ठसा उमटवणारे मुख्यमंत्री म्हणून सिद्धरामय्यांची नोंद आहे. त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक काळ म्हणजे ८ वर्षे १२ दिवस काम पाहिले. महत्त्वाचे म्हणजे सलग पाच वर्षे मुख्यमंत्री राहण्याच विक्रमही सिद्धरामय्यांचाच आहे. राज्याच्या इतर कोणत्याही मुख्यमंत्र्याला सलग पाच वर्षे हे पद भूषवता आलेले नाही.

एकूण कालावधीच्या बाबतीत सिद्धरामय्यांच्या खालोखाल सर्वाधिक काळ देवराज अर्स यांनी मुख्यमंत्रीपद भूषविले आहे. त्यांनी ७ वर्षे २३८ दिवस, एस. निजलिंगप्पा यांनी ७ वर्षे १७५ दिवस, रामकृष्ण हेगडे यांनी ५ वर्षे २१६ दिवस, बी. एस. येडियुराप्पा यांनी ५ वर्षे ८२ दिवस, तर एस. एम. कृष्णा यांनी ४ वर्षे २३० दिवस मुख्यमंत्रीपद सांभाळले.

राज्यात १९५२ मध्ये पहिली विधानसभेची निवडणूक झाली होती. त्यानंतर राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून केंगल हनुमंतय्या बनले. त्यानंतर कदीलल मंजाप्पा, एस. निजलिंगप्पा यांना संधी देण्यात आली. दुसरी विधानसभा निवडणूक १९५७ मध्ये झाली. त्या पाच वर्षांत एस. निजलिंगप्पा आणि बी. डी. जत्ती यांनी मुख्यमंत्रीपद भूषविले. तिसरी निवडणूक १९६२ मध्ये झाली. त्या पाच वर्षांत एस. आर. कंठी, एस. निजलिंगप्पा हे दोघे मुख्यमंत्री बनले. चौथी निवडणूक १९६७ मध्ये झाली. त्या पाच वर्षांत एस. निजलिंगप्पा, वीरेंद्र पाटील यांनी मुख्यमंत्रीपद भूषविले.

सहावी निवडणूक १९७८ मध्ये झाली. त्यावेळी देवराज अर्स, आर. गुंडूराव यांनी मुख्यमंत्रीपद भूषवले. सातवी निवडणूक १९८३ मध्ये झाली. त्यावेळी रामकृष्ण हेगडे मुख्यमंत्री बनले. आठवी निवडणूक १९८५ मध्ये झाली. त्यावेळी रामकृष्ण हेगडे, एस. आर. बोम्मई यांनी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली.

नववी निवडणूक १९८९ मध्ये झाली. त्यावेळी वीरेंद्र पाटील, एस. बंगारप्पा, विराप्पा मोईली असे तिघे जण मुख्यमंत्री बनले. १९९४ मध्ये दहावी निवडणूक पार पडली. त्यावेळी एच. डी. देवेगौडा आणि देवेगौडा पंतप्रधान बनल्यानंतर जे. एच. पटेल मुख्यमंत्री बनले. अकरावी निवडणूक १९९९ मध्ये झाली त्यावेळी साडेचार वर्षे एस. एम. कृष्णा हे एकटेच मुख्यमंत्री राहिले. बारावी निवडणूक २००४ मध्ये झाली. त्या तीन वर्षात एन. धरमसिंग, एच. डी. कुमारस्वामी हे दोघे मुख्यमंत्री राहिले.

पण येडियुराप्पांना मुख्यमंत्रीपद देण्याची वेळ आली त्यावेळी कुमारस्वामींनी नकार दिला. त्यामुळे तेरावी निवडणूक २००८ मध्ये झाली. त्यावेळी बी. एस. येडियुराप्पा, सदानंद गौडा, जगदीश शेट्टर असे तिघे मुख्यमंत्री बनले. तेरावी निवडणूक २०१३ मध्ये पार पडली, त्यावेळी एस. एम. कृष्णा, चौदावी निवडणूक २०१३ मध्ये झाली. त्या निवडणुकीत काँग्रेसने बहुमत मिळवले आणि सिद्धरामय्या सलग पाच वर्षे मुख्यमंत्री राहिले. म्हणजेच कर्नाटकाच्या इतिहासात पहिल्यांदाच एकच व्यक्ती पाच वर्षे मुख्यमंत्रीपदी राहिली. ते म्हणजे सिद्धरामय्या. त्याआधी एस. एम. कृष्णा यांनी सलग साडेचार वर्षे मुख्यमंत्रीपद भूषवले होते.

पंधरावी निवडणूक २०१८ मध्ये झाली, त्यावेळी एच. डी. कुमारस्वामी, बी. एस. येडियुराप्पा, बसवराज बोम्मई असे तिघे जण मुख्यमंत्री बनले. सोळावी निवडणूक २०२३ मध्ये पार पडली, त्यावेळी सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्रीपदी संधी देण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT