बेळगाव

Online SIR Form: ऑनलाईन भरा ‘एसआयआर’ अर्ज

राज्य सरकारचे आवाहन : २९ जुलै अखेरची मुदत, दुरुस्‍ती करणेही सोपे

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : सध्या एसआयआरवरुन लोकांमध्ये गोंधळ सुरु आहे. मराठी भाषिकांना कन्नड अर्ज देण्यात आले आहेत. ते समजत नसल्याने अडचण निर्माण झाली आहे. तर अनेक ठिकाणी बीएलओंनी लोकांना अर्जच दिलेले नाहीत. मात्र, ऑनलाईन अर्ज भरण्याचीही सोय आहे. त्यामुळे, राज्य सरकारनेही लोकांना ऑनलाईन अर्ज भरण्याचे आवाहन केले आहे.

भारतीय निवडणूक आयोग मतदार ओळखपत्रे अद्ययावत करण्यासाठी आणि पडताळणी करण्यासाठी स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन (एसआयआर) नावाची एक विशेष मोहीम चालवत आहे. ही प्रक्रिया ऑनलाईनही पूर्ण करता येऊ शकते. एसआयआरअंतर्गत मतदार गणना फॉर्म भरुन सादर करणे आता पूर्णपणे ऑनलाईन आहे. भारतीय निवडणूक आयोगाने ही प्रक्रिया सोपी आणि डिजिटल केली आहे. आता voters.eci.gov.in या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरता येऊ शकते. याद्वारे नोंदणी थेट अपडेट होते. यामुळे घरबसल्या मतदार डेटा व्हेरिफिकेशन आणि दुरुस्ती करणे अत्यंत सोपे झाले आहे.

निवडणूक आयोगाने ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी आणि सादर करण्यासाठी मतदार ओळखपत्र आणि मोबाईल नंबर लिंक करणे अनिवार्य केले आहे. प्रत्येक मतदाराने अर्ज भरुन तो बीएलओ किंवा ऑनलाईन पोर्टलवर सबमिट करणे आवश्यक आहे. जर एपिक आधीच लिंक केलेला नसेल तर फॉर्म-८ द्वारे मोबाईल नंबर अपडेट करुन तो त्वरित लिंक करता येईल, असे आयोगाचे म्हणणे आहे.

ऑनलाईन अर्ज कसा भरायचा?

सर्वप्रथम voters.eci.gov.in वर जा., येथे Fill Enumeration Form वर क्लिक करा. साईन अप करा त्यानंतर मोबाईक क्रमांक आणि कॅप्चा भरुन ओटीपीवर क्लिक करा. मोबाईलवर आलेला ओटीपी भरा. तुमचे राज्य निवडा आणि एपिक क्रमांक प्रविष्ट करा. तुमची निवडणूक माहिती स्क्रीनवर दिसेल, ती काळजीपूर्वक तपासा. फॉर्म भरण्यापूर्वी मोबाईल नंबरशी EPIC लिंक करणे आवश्यक आहे. जर EPIC लिंक केलेले नसेल, तर फॉर्म-८ सबमिट करुन ते ताबडतोब लिंक करता येईल. यासाठी Correction of Entries in Existing Electoral Roll वर क्लिक करा आणि फॉर्म-८ मधील फक्त मोबाईल नंबर पर्याय निवडा. एकदा EPIC लिंक झाला की पुन्हा लॉग इन करा. आता मागील एसआयआर संबंधित माहितीसह Enumeration Form भरा. फॉर्म आता आधार आधारित ई-साइनद्वारे सबमिट करा. लक्षात ठेवा की ई-साइनसाठी, EPIC आणि आधारमधील नाव सारखेच असले पाहिजे.

अर्ज अपलोड झाला की नाही, अशा प्रकारे तपासा

voters.eci.gov.in या संकेतस्थळावर जा. होमपेजवरील Fill Enumeration Form वर क्लिक करा, यामुळे लॉगिन/साइन-अप पेज उघडेल. साइन अपवर क्लिक करा, मोबाईल नंबर, पर्यायी ईमेल आयडी आणि कॅप्चा टाकून नोंदणी पूर्ण करा. आता लॉगिन वर जा, मोबाईल नंबर आणि कॅप्चा एंटर करा, नंतर रिक्वेस्ट ओटीपीवर क्लिक करा आणि ओटीपी एंटर करून लॉगिन करा.

लॉग इन केल्यानंतर तुमचे प्रोफाइल वर दिसेल, पुन्हा Fill Enumeration Form वर क्लिक करा. आता EPIC (मतदार आयडी) क्रमांक प्रविष्ट करा. Search वर क्लिक करा, तुमच्या फॉर्मचे स्टेटस लगेच दिसून येईल. फॉर्म अपलोड केला असेल, तर तुम्हाला तुमचा फॉर्म आधीच मोबाईल नंबरसह सबमिट केला गेला आहे, असा संदेश दिसेल. हा संदेश दिसत नसेल आणि एक नवीन फॉर्म विंडो उघडली तर याचा अर्थ असा की तुमचा फॉर्म अपलोड झालेला नाही. जर चुकीचा मोबाईल नंबर दाखवला गेला किंवा तुम्ही तो सबमिट केलेला नसतानाही सबमिट केलेला दाखवला गेला तर ताबडतोब तुमच्या बीएलओशी संपर्क साधा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT